शिरुर पोलीसांमुळे जखमीला मिळाले तत्काळ उपचार

No automatic alt text available.शिरुर, ता. २० डिसेंबर २०१८ (सतीश केदारी) : राञीच्या वेळेस रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेस शिरुर पोलीसांमुळे तत्काळ उपचार मिळू शकल्याची घटना बुधवारी (दि. १९) घडली.

याबाबत सविस्तर असे कि, आळे (ता.जुन्नर) येथील आई अन मुलगा हे बारामतीवरुन दुचाकीवरुन न्हावरे शिरुर रस्त्याने शिरुर कडे येत होते.कर्डे घाटानजीक आले असता अंधार खुप असल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने मागे बसलेल्या महिलेचा तोल गेला अन रस्त्यावर पडली.

गाडी चालवत असलेल्या मुलाच्या तत्काळ लक्षात आल्यानंतर गाडी थांबवुन रस्त्यावरील जाणा-या येणा-यांना मदतीसाठी विनंती केली परंतु कोणीही थांबत नव्हते.दरम्यान शिरुर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक युसुफ इनामदार, नितीन गायकवाड, संजय जाधव, रविंद्र पाटमास, संतोष भोसले हे पोलीस पथक शिरुर कडे येत होते. यावेळी अपघात झाल्याचे व मदतीची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ गाडी थांबवुन स्वत:गाडीत जखमी महिलेस व मुलाला घेतले. शिरुर येथील श्रीगणेशा हॉस्पिटल मध्ये दाखल केले. इतकेच नव्हे तर पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी घाबरलेल्या त्या मुलास ,"आम्ही सर्व पोलीस आहोत मिञा घाबरु नकोस. काही मदत लागल्यास सांग". असे म्हणत आधार दिला. यावेळी श्रीगणेशा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही तत्काळ उपचार सुरु केले.

घटना घडल्यानंतर अनेकांनी वर्दीतील माणुसकिचा प्रत्यय आल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या