शिरुर, ता.२० डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : ग्रामीण डाकसेवकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप दुस-याही दिवशी शांततेत सुरु असुन या संपास चागला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामीण डाक सेवक संघटनेचे पुणेजिल्हाध्यक्ष महेंद्र सावंत यांनी दिली.
ग्रामीण डाकसेवकांनी (दि.१८) पासून संप पुकारला असून या मध्ये पेंशन फंड टीआरसीच्या १०टक्के कपात करण्यात यावा, कमिटीच्या शिफारशीप्रमाणे कर्मचा-यांचे बदलीचे आदेश काढावेत,स्वेच्छानिवृत्ती त्वरीत लागू करावी, सर्व कर्मचा-यांना नियमित कर्मचा-यांचा दर्जा देण्यात यावा, फरकाचे मुल्यमापन कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशीनुसार लागु करावे अशा विविध मागण्या केलेल्या आहेत.दरम्यान शिरुर पोष्ट अॉफिस समोर टपाल कर्मचा-यांनी एकञ येउन आंदोलन केले.मागण्या जो पर्यंत पुर्ण होत नाही तो पर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचे राउत यांनी सांगितले.
या वेळी बापू जगदाळे, भानुदास टेमगिरे, दत्ताञय इसवे, घनश्याम शितोळे, मच्छिंद्र लांडे, अली शेख, शांतीलाल सावंत, भालचंद्र गायकैवारी, शब्बीर खान, ए.पी.सावंत, राजू खुडे, दिलीप कुंभार, मल्लाव, धरणे, शिवराम गवळी आदी उपस्थित होते.