स्थनिक गुन्हे शाखेची शिरुर तालुक्यात सिनेस्टाईल कारवाई

वडगाव रासाई,ता.२२ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिरुर तालुक्यात रांजणगाव-शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी छापे टाकल्याने दारुडे,जुगा-यांची एकच पळापळ झाली.या कारवाईत मोठा साठा जप्त करण्यात आला असुन आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिरुर तालुक्यात विविध ठिकाणी चालु असलेल्या अवैध धंद्यांची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचुन कारवाई केली. या मध्ये वडगाव रासाई(ता.शिरुर) येथील बंद पडलेल्या एका पेट्रोलपंपा लगत मोकळ्या जागेत जुगाराचा खेळ चालु असल्याची माहिती मिळाली होती.त्यावेळी पोलीसांनी अचानक छापा टाकुन ९ जणांना ताब्यात घेतले.तर दोघे पळुन गेले. या आरोपींकडुन जुगाराची साधने व ५४१०० रुपये रोख रक्कम जप्त केली.

तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव जवळ कारेश्वर चौकात बेकायदा अवैध दारु विक्री करणा-या दोघांवर गुन्हे दाखल केले असुन त्यांच्याकडुन देशी दारुच्या मेजर कंपनीच्या ४३ बाटल्या, देशी दारु टॅंगो पंच च्या २४ बाटल्या,तीन निळया रंगांच्या ३५ लिटरच्या प्लॅस्टीक कॅन मध्ये हातभट्टी,रोख रक्कम  अशी एकुण २१३८४ रुपये किंमतीचा माल जप्त केला.

शिरुर चौफुला रस्त्यावरील आंबळे गावानजीक केसरी हॉटेलवर टाकलेल्या धाडीत  देशी दारु टॅंगो पंच च्या २१ बाटल्या, किंगफिशर कंपनीच्या १३ बाटल्या, टुंबर्ग कंपनीच्या १३ बाटल्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या २ बाटल्या,मॅकडोनाल्ड नंबर १ च्या ३ बाटल्या, अॉफिसर चॉइसच्या ३, इंमेपरियल ब्ल्यु च्या ३ बाटल्या असा  मिळुन ७११४ रुपयाचा माल ताब्यात घेतला असुन हॉटेलचा मालक व कामगार यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिरुर पोलीस स्टेशनहद्दीतील कवठे येमाई गावच्या हद्दीतील निमंञण हॉटेल मध्ये टाकलेल्या छाप्यात ३ रॉयल स्टॅग,५ अॉफिसर चॉइस,२ ग्रॅन्ड मास्टर वोडका या विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असुन एकावर कारवाई करण्यात आली. टाकळी हाजी गावच्या हद्दीत राहत्या घराजवळ गावठीदारुची चोरुन विक्री करणा-या एकावर कारवाई करण्यात आली असुन तयार केलेली गावठीदारु जप्त करण्यात आली आहे.

शिक्रापुर येथे हॉटेल गंधर्व च्या पाठीमागे अवैध धंद्यावर गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत सहा आरोपींना ताब्यात घेतले.व १२७३५ रुपये किंमतीचा अवैध दारुचा साठा जप्त करण्यात आला.हि कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुंढे,गिरमकर,गायकवाड,राजु मोमीन,कांचन जाधव,नवले यांनी पार पाडली.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, सुभाष राउत, गुरुनाथ गायकवाड, रविराज कोकरे, प्रविण मोरे, अनिल काळे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

शिरुर तालुक्यात अवैध धंदे पुन्हा फोफावत चालले असुन शिरुर तालुक्यात सिनेस्टाइलने झालेल्या अचानक कारवाईने अनेकांची पळापळ झाली तर अवैध धंदे करणा-यांवर व तसे आढळुन येणा-यांवर यापुढेही कडक कारवाई करणार असल्याचे पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरससागर यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या