आमदाबादच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी नितीन थोरात

Image may contain: 1 person, smilingआमदाबाद, ता.२२ डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : आमदाबाद येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच श्री. नितीन अर्जुन थोरात यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष म्हणुन लक्ष्मण राधूजी जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच लता आण्णासो नर्हे, उपसरपंच जिजाबाई जनार्दन माशेरे, घोडगंगा सह.सा.कारखान्याचे संचालक ॲड. रंगनाथभाऊ थोरात, मा. सरपंच योगेश थोरात, पोपटराव घुले, संदिप जाधव, उषा साळवे, संगीता जाधव, उषा पवार उपस्थित होते.

श्री. नितीन अर्जुन थोरात हे गेल्या अनेक वर्षे सामाजिक कार्यात सहभागी असुन यापुर्वी विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. गावात एकोपा राहावा, शांतता कायम राहावी, गावचे तंटे गावातच मिटावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडीनंतर बोलताना थोरात यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या