वीज मनोरावाल्यांची परवानगीशिवाय घुसखोरी...

Image may contain: one or more people, sky, outdoor and natureवाघाळे, ता. 23 डिसेंबर 2018: शिरूर तालुक्यात सध्या वीज मनोऱयाचे काम सुरू आहे. परंतु, शेतकऱयांची कोणतीही परवानगी न घेता अथवा पुर्व कल्पना न देता घुसखोरी करून शेतीचे नुकसान केले जात आहे.

शिरूर तालुक्यात वीज मनोऱयाचे काम सुरू आहे. शेतकऱयांना कोणतीही माहिती न देता अथवा परवानगी न घेताच शेतामध्ये खुसखोरी करून शेतीचे नुकसान केले जात आहे. संबंधित अधिकाऱयांना विचारणा केली असता, आम्हाला सरकारची परवानगी आहे. आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करू, असे अरेरीवाचे उत्तर दिले जात आहे. यामुळे अनेक शेतकऱयांनी दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न पडला आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे शेतीचे नुकसान, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

वाघाळे येथे अंकुश धायबर, प्रभू धायबर, वसंत धायबर व शंकर धायबर यांनी लाखो रुपये खर्च करून माळराणाचे रुपांतर नुकतेच शेतीमध्ये केले आहे. परंतु, वीज मनोरा कंपनीने कोणतीही पुर्व सुचना न देता अथवा परवानगी न घेता थेट शेतामध्ये ट्रॅक्टरसह अवजड वाहने घातली व साहित्य आणून ठेवले आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले असून, पुन्हा मोठा खर्च करावा लागणार आहे. अगोदरच मेटाकुटीला आलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

वीज मनोरा उभारायला शेतकऱयांचा अडथळा नाही. परंतु, शेतकऱयांना पुर्वकल्पना देणे गरजेचे आहे. परवानगी घेऊ नका पण किमान माहिती तरी द्या, अशी गयावया शेतकरी करू आहेत. यामुळे संबंधित जमीनीचा मालक कंपनीचे अधिकारी आहेत का? असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱयांना पडला आहे. वीज मनोरा कंपनीच्या अधिकाऱयांकडे विचारणा केली असता अरेरावीची उत्तर मिळत आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱयांनी दाद मागायची कोणाकडे? याकडे सरकारी अधिकारी व संबंधित कंपनीचे अधिकारी लक्ष देतील का? असा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, परिसरातील शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसान भरपाई न दिल्यास शेतकऱयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या