शेलार मळा शाळेत बाल आनंद मेळावा

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoorरांजणगाव सांडस,ता.२४ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव सांडस केंद्रातील शेलार मळा या शाळेत शिक्षण परिषद व बाल आनंद मेळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास केंद्रातील 24 शाळेतील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. प्राथमिक शाळा शेलार मळा अंगणवाडी व वस्तीतील हायस्कूलचे एकूण शंभर विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रथम सत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख वेताळ सर हे होते. अध्यक्षस्थान नागरगाव चे माजी उपसरपंच सचिन शेलार यांनी भूषवले.प्रास्ताविक जि. प. प्राथमिक शाळा शेलार मळा शाळेतील शिक्षक श्री सुभाष बांदल सर यांनी केली. शाळेतील शिक्षक श्री शामराव जगताप यांनी विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य सादर केले. त्याला केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ यांनी उस्फुर्त प्रतिसाद व बक्षिसे दिली.

विद्यार्थ्यांच्या भाजीपाला बाजाराला ग्रामस्थ व शिक्षक शिक्षिका महिला यांनी चांगला प्रतिसाद दिला. शाळेला आठवडा बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते शाळेतील 50 विद्यार्थी सहभागी झाले "ना नफा ना तोटा" या उक्तीप्रमाणे एकूण सोळाशे रुपयांची विक्री झाली.कार्यक्रमाला संदीप शेलार,  मोहन शेलार, अमित रणदिवे, कैलास शेलार, रमेश शेलार, विकास रणदिवे, रामभाऊ शेलार,विद्याधर शेलार यांनी सहभाग घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या