महिलांचा हमीभावासाठी शिरुरला एल्गार (व्हिडिओ)

Image may contain: 4 people, people standing and crowdशिरुर, ता.२८ डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : कांद्याला हमीभाव..मिळालाच पाहिजे,उसाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतक-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या सरकारचा धिक्कार असो अशा  धोषणा देत, सरकारच्या विरोधात जोरदार आक्रोष करत  वडनेर (ता. शिरुर) येथील शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरत शिरुर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला होता.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत या पुढील होणा-या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा इशारा देउन राज्यातील शेतक-यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान करता सर्व शेतक-यांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही या महिलांनी केले. वडनेर(ता.शिरुर) येथील साईक्रांती प्रतिष्ठान व वडनेर ग्रामस्थांनी शिरुर तहसिल कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले होते.


प्रारंभी शिरुर बाजारसमितीत छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर निघालेल्या मोर्चात शेकडो महिलांनी सहभाग घेत हा मोर्चा शिरुर तहसिल कार्यालयावर धडकला. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.तहसिल कार्यालयासमोर झालेल्या सभेत अनेकांनी सरकारबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गेल्या अनेक दिवसांपासुन शेतक-यांच्या शेतीमालाला बाजारभाव योग्य बाजारभाव मिळत नाही. पुणे, नाशिक, सोलापुर, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यातील मुख्य पीक असणा-या कांदा पीकास बाजार मिळत नाही शेतक-यांचे अर्थकारण कांदा पिकावर अवलंबुन असते तो कांदा कवडीमोल बाजारभावात विकावा लागत आहे.उसाच्या संदर्भात तशीच परिस्थिती आहे.मुख्य पिकाबरोबरच इतर जोडधंदा असणा-या दुधाच्या बाबत तशीच स्थिती असुन शेतकरी शेतमालाच्या बाबत  भरडला जातोय.शेतकरी पुर्ण रसातळाला चालला असुन सरकार माञ कोणतीही पावले उचलायला तयार नाही.

जोपर्यंत आमच्या संपुर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वडनेर गावच्या सर्व शेतकरी बांधवांच्यावतीने, साईक्रांती प्रतिष्ठाण,ग्रामपंचायत,वडनेर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत, सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद,विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकत असुन कोणत्याही प्रकारचे मतदान करणार नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.त्याचप्रमाणे शेतमालाला दुप्पट हमिभाव, कांद्याला हमीभाव, कांदा निर्यात शुल्क शुन्य करावे,दुधाला ३० रु.लिटर भाव मिळावा, शेतकरी विरोधी कायदे  रद्द करावेत, शेतीला उद्योग व्यवसायाचा दर्जा मिळावा अशा प्रकारचे निवेदन शिरुर तहसिल कार्यालयाला देण्यात आले.तर मागण्यांचे निवेदन शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मुंढे यांनी स्विकारले.

या वेळी विक्रम निचित, नवनाथ निचित, मंगल निचित, कमल निचित, सुवर्णा निचित, शेवंता निचित, ससंगिता निचित, जनाबाई निचित, अनिता निचित, अलका निचित, मंगल निचित, पुजा निचित यांसह शेकडो महिला, मुले, तरुणवर्ग शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या