मांडवगणला २१ सामुदायिक विवाह थाटात संपन्न

Image may contain: 1 person, crowdमांडवगण फराटा, ता.३१ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी)  : मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ विवाह थाटात संपन्न झाले.

मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे येथील दादा पाटील फराटे मित्रमंडळाच्या वतीने सर्वधर्मीय, बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात विविध जाती-धर्माचे २१ विवाह लावण्यात आले. यावेळी सहभागी वधुवरांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.

Image may contain: 1 person, standing, crowd and outdoor
सकाळी सर्व २१ जोडप्यांचा सामुहिक हळदी समारंभ करण्यात आला. त्यानंतर सर्व वरांची गावातून दोन ट्रॅक्टरमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.सायंकाळी निश्चित वेळेत विवाह सोहळा पार पडला.

याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, श्रीगोंद्याचे आमदार राहूल जगताप, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, अशोक पवार, रंजना कुल, जगन्नाथ शेवाळे, श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ऊर्जा उद्योग समुहाचे प्रकाश कुतवळ, बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, पुणे जिल्हा बँकेचे संचालक निवृत्ती अण्णा गवारे, डॉ. वर्षा शिवले, कृषीउत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पवार, भाजपा युवा मोर्चाचे सुदर्शन चौधरी, चंद्रकांत भरेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी ह.भ.प. सुदाम गोरखे गुरुजी, ह.भ.प. दयानंद महाराज गिरी वधु-वरांना शुभाशिर्वाद दिले.सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी मांडवगण फराटा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. विवाह सोहळ्याचे आयोजक दादा पाटील फराटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या