किशोरराजे निंबाळकर यांची पदोन्नती; न्हावरेत सत्कार

Image may contain: 17 people, people smiling, people standing and indoor
न्हावर, ता. 7 जानेवारी 2019: जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची महाराष्टृाच्या मंत्रालयात सचिवपदी नूकतीच पदोन्नती झाली असून, त्याबद्दल निंबाळकर यांचा न्हावरे येथे त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी (ता. 5) सत्कार करण्यात आला.

निंबाळकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिरूर तालुक्‍यातील न्हावरे येथे झाले. त्यानंतर पदवी व पदव्यूत्तर शिक्षण नगर जिल्ह्यातील राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठात झाले. 1986 साली राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या उपजिल्हाधिकारी परिक्षेत त्यांनी राज्यात व्दीतीय क्रमाकांने यश संपादन केले होते. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यापासून सोलापूर, सांगली, पिंपरी-चिंचवड येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर राज्याचे माजी उपमूख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे विशेष कार्याधिकारी तसेच राज्याचे सहसचिव, विक्रीकर उपायूक्त, ठाणे जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना प्राधनमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत ठाणे जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान मिळवून दिल्याबद्दल निंबाळकर यांचा मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला होता.

जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना लोकाभिमूख योजना राबवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे. सचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी उपसरपंच अरूण तांबे, शिवराय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप यादव, विघ्नहर सहकारी संस्थेंचे अध्यक्ष शहाजी खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या