...नाहीतर पवारांची अवलाद सांगणारः अजित पवार

Image may contain: 1 person
शिरूर, ता. 7 जानेवारी 2019: पवारसाहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला; तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची माझी तयारी आहे. मी निवडणूक लढविली तर निवडूनच येईल; नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. शिरूर येथे रविवारी (ता. 6) कार्यक्रमानिमित्त अजित पवार आले होते. त्या वेळी त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत भाष्य केले.

अजित पवार म्हणाले, 'लोकसभेसाठी एकेक खासदार महत्त्वाचा असून, त्यादृष्टीने शिरूरची जागादेखील आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शिरूरच्या खासदारांचा महिमा आता संपला आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक सोपी आहे. धाडसाने त्यांच्याविरोधात उभे राहणाऱ्याचा विजय निश्‍चित आहे. आमच्यातील जो लढेल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन-तीन स्थानिकांना शिरूर लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत बोललो आहे. पण ‘नको राव दादा, मला आमदारच व्हायचंय...’ अशा त्यांच्या भूमिकेमुळे आता माझी लढायची तयारी आहे. मी कालच पवारसाहेबांना सांगितले की, शिरूर लोकसभेसाठी तुम्हाला योग्य उमेदवार मिळत नसेल तर आपली लढायची तयारी आहे. हयगय करणार नाही. या मतदारसंघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे. मी येथून उमेदवारीचा फॉर्म भरला; तर शंभर टक्के निवडून येईल, त्याशिवाय पवारांची अवलाद सांगणार नाही. मी जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे  पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू.’’

पुळचटपणा करताहेत...

मी, आमच्यातल्या (राष्ट्रवादीतल्या) दोघा-तिघांना सांगतोय, लोकसभा लढवा निवडून आणायची जबाबदारी माझी; तर ते "नको राव दादा, मला आमदारच व्हायचंय' असला पुळचटपणा करताहेत. भुलभुलैय्या करणाऱ्या इथल्या खासदाराचे आता सगळे संपलंय. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी प्रत्येकाने शिरसावंद्य मानावी, असे आदेश देत अजितदादांनी स्वतःच्या उमेदवारीचे खडे संकेत दिले. मी पहिल्यांदा या भागाचा खासदारच होतो. आता आमच्या सहकाऱ्यांना म्हटले तुम्ही खासदार व्हा; तर ते म्हणतात, नको राव, दादा मला आमदारच करा, हे काय कामाचे ? असा सवाल करून ते म्हणाले, "अरे आमदार एका तालुक्‍याचा; तर खासदाराच्या हातात सहा तालुके असतात. पण नकोच, म्हटल्यावर काय करायचे. मी खासदार होतो. पवार साहेबांसाठी हा मतदारसंघ खाली करून देण्याची सूचना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी केल्यावर क्षणात राजीनामा दिला. परत आमदार झालो, नंतर मंत्री, उपमुख्यमंत्री देखील झालो. तुमचे नशीब असेल; तर तुम्हीही असे पुढे जाऊ शकता. फक्त त्यासाठी धाडस महत्वाचे असून, पक्ष देईल ती जबाबदारी उचलायची तयारी ठेवावी लागेल.''

मग मागे का सरायचे...

शिरूर लोकसभा, विधानसभेला काय गंमत होते ते कळत नाही. आपल्याकडून त्यांच्याविरोधात (आढळराव) कुणीही उभे राहिले तरी निवडून येतील, अशी स्थिती आहे. मग मागे का सरायचे. मी कालच पवार साहेबांना सांगितले की, शिरूर लोकसभेसाठी तुम्हाला योग्य उमेदवार मिळत नसेल, तर आपली लढायची तयारी आहे. हयगय करणार नाही. या मतदार संघासाठी पक्ष जी जबाबदारी देईल, ती उचलायची तयारी आहे. मी आज सांगतो मी येथून उमेदवारीचा फॉर्म भरला; तर शंभर टक्के निवडून येईल, त्याशिवाय पवारांची औलाद सांगणार नाही. मी जे बोलतो, ते करतोच, हे लोकांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल, तो शिरसावंद्य मानून काम करू.''

नवनवीन गाजरं दाखवतील...
अजितदादांनी सुरवातीलाच स्थानिक मतदारांची फिरकी घेतली. दादा हे करा, दादा ते करा म्हणत माझ्याकडे येता. पण माझ्या हातात काय ठेवले आहे? तुम्ही निवडणुका आल्या की आमचे ऐकत नाही. आम्ही सांगू ती बटणे न दाबता भलतीच बटणे दाबता. आता यापुढे लक्षात ठेवा, आम्ही सांगू ती बटणे नाही दाबली तर वाटोळ्याशिवाय तुमच्या हातात काहीच राहणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. चुनावी जुमला सुरू झाला असून, केंद्र व राज्यातील सत्ताधारी नेते गावोगाव फिरून भुलभुलय्या करतील, नवनवीन गाजरं दाखवतील. पण आता तरी त्यांच्या भुलभुलय्याला भुलू नका. अन्यथा वाईट परिस्थितीतून तुम्हाला कुणीही सावरू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या