शिरुरच्या आखाड्यात कोण-कोण उतरणार ?

Image may contain: 1 person, smiling
शिरुर
, ता. ९ जानेवारी २०१९ (प्रतिनीधी) :
शिरुर लोकसभा मतदार संघात दोन दिग्गज दादांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने राज्यभरात जोरदार चर्चा रंगली माञ त्यातही लोकसभेसाठी आधीच मैदानात तयारी केलेले पैलवान धांदल उडवणार असल्याची चर्चा शिरुर लोकसभा मतदार संघात सुरु आहे.

शिरुर येथे एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी मी जर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा फॉर्म भरला तर या मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवील अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर शिरुर लोकसभेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणताहेत तर त्यांनी हिंमत असेल तर लढुन दाखवावेच. शिरुर लोकसभा मतदारसंघातुन अजितदादांना पराभुत केले नाही तर मराठ्यांची अवलाद सांगणार नाही अशा शब्दांत थेट अजित पवारांनाच खुले आव्हान दिले होते. या दोन दिग्गज दादांनी एकमेकांना शड्डु ठोकत आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने शिरुर मतदारसंघासह राज्यभर चर्चेला उधान आले आहे.

शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे शिरुर लोकसभा मतदार संघात सलग तीन टर्म खासदारपदी निवडुन आले आहेत. आढळराव यांचा शिरुरसह भोसरी,हडसपर परिसरातही चांगला संपर्क आहे. राष्ट्रवादीला सलग तीन वेळा या मतदारसंघात हार पत्कारावी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या पुर्वी शिरुर ला झालेल्या विविध कार्यक्रमांतुन सातत्याने तशी खंतही व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची शिरुर लोकसभेबाबत वारंवार चर्चा होतेय.त्यामुळे आढळराव पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दुसरीकडे नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणा-या अन ऐनवेळीस धांदल उडविणा-या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करून करत आहेत. बांदल हे शिरुर, आंबेगाव सह लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी दिसुन येत असून, या मैदानात सर्वात आधी उतरले असून यातही धांदल उडवणार कि काय? असा सवाल केला जात आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या