भुकेल्या वासराला पाजी कुत्री मायेने दुध (व्हिडिओ)

Image may contain: 4 people, people standing, outdoor and natureशिरुर, ता.१० जानेवारी २०१८(मुकुंद ढोबळे) : ऐन  दुपारचा प्रहर..एक गोमाता हात पाय खोडत आयुष्याचा शेवट मोजत होती.बाजूला तिथे एक तान्हेले  वासरू हंबरडा फोडत होतं... परंतु तरीही कोणाच्या लक्षात हे आले नाही... अचानक एकाची  नजर त्याच्याकडे गेली... पाहतो तो काय काहीतरी खाल्याने गायीचे पोट तुडुंब फुगलेले...गायीची अवस्था पाहून तेथे आणखी चार-पाच जण गोळा झाले...अचानक तरुणांचे मदतीसाठी फोन  नंबर फिरू लागले....मग पुढे काय होते..?
सविस्तर असे कि, शिरुर शहरातील एका  हॉस्पिटल जवळ पोट  फुगलेल्या अवस्थेत मरणासन्न अवस्थेत पडलेली.यावेळी काही स्थानिक तरुणांनी मदतीसाठी डॉक्टरांना मदतीसाठी फोन केले.तरुणांच्या या तत्परतेनंतर पशुवैद्यकीय अधिकारी तत्काळ घटनास्थळी आले.रस्त्याने जाणारी पंचक्रोशीचे शेतकरीही मदतीला आले.शेतकरी बांधवांनी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गोमाता वाचवण्यासाठी साठी प्रयत्न सुरू केले.दरम्यान वासरु हंबरडा फोडत होते.त्या गाय ने प्लास्टिक सारखी काही तरी वस्तू खाल्ले असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.त्यामुळे तिच्या पोटात गॅस झाला असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला.गायनी आपले डोळे फिरवले होते.पायांची हालचाल थंडावली होती.परंतु उपस्थित तरुणांना मात्र गाईला वाचवण्याची जिद्द होती.डॉक्टरांनी सलाईन लावावी लागेल असे सांगतात उपस्थित तरुणांनी काही वेळात सलाईन उपस्थित केली.शरीरातील गॅस कमी होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असे बोलले.उपस्थित तरुणांना याबाबत काहीच माहिती नव्हती.

डॉक्टरांनी खचाखच गाय च्या पोटामध्ये  दोन-तीन जागी इंजेक्शन  लावले.काही जाणकार तरुणांनी ट्रॅन्जॅक्‍शन दाबून धरून पोट दाबू लागली.पोटातील झालेला गॅस त्या इंजेक्शन वाटे बाहेर येऊ लागला.सलाईन लावण्याचे डॉक्टरांनी सांगितले.आणखी सलाईन तरुणांनी आणले. परंतु गाईच्या शरीरात हे सलाईन आउट जाऊ लागले. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. उपस्थित तरुण पाहिजे ती मदत करत होते. तर गाईचे वासरू भुकेने हंबरडा फोडत होते. निपचित पडलेल्या आपल्या आईकडे पाहत होते.त्या लहानशा जीवाला काही समजत नव्हते. गर्दीला पाहून ते दबकत होते. नक्की काय झाले हे समजण्याची त्याची क्षमता नसेल कारण ते काही दिवसाचे लहान बाळंच़ होते.या बाळाच्या आई ठीक व्हावी म्हणून डॉक्टर आणि तरुण प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.सर्वांचे लक्ष का इकडे लागले असताना.छोटेसे गाईचे लहान वासरू कडे कोणाचे लक्ष नव्हते.अचानक कोणाच्या तरी तोंडातून आई ग असा  शब्द उच्चारला गेला.काय झाले कोणाला कळलेच नाही.ज्या वेळेस पाहिले गाईचे वासरू एका कुत्र्याच्या स्तनाला तोंड लावून तिचे दूध पीत होते.आणि ती कुत्रं कुठलीही हालचाल न करता.

त्या गाईच्या वासराला आपलं स्तनपान करून देत आणि पाहून तेथे उपस्थित सर्वांचे मन गहिवरून आले.कुत्र्यांनी गाईच्या वारसाला स्तनपान करण्याची ही पहिलीच वेळ असावी.निसर्गाच्या नियमाविरुद्ध.या आगळ्यावेगळ्या नात्याने  उपस्थित सर्व जण गहिवरून गेले होते.त्यानंतर काहीवेळाने  डॉक्टरांनी सांगितले.आता या गाईचे वाचणे अशक्य आहे.तीन ते चार तासापासून मदत करणारे सर्व तरुण आपल्या प्रयत्नांना यश आले नाही म्हणून उदास झाली. जाताना काहींनी उसाचे चारा आणून टाकला. तोपर्यंत अंधार झाला होता. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करून निघून गेले.हळूहळू गर्दी कमी झाली. वासराला कुठे ठेवायचे याबाबत चर्चा सुरू झाल्या.एक-दोन तास गेल्यानंतर अचानक कोणीतरी सांगितले गाय उठून बसली आहे. याची माहिती एकमेकांना तर सांगितली. अचानक पुन्हा मदत करणाऱ्या तरुणांची गर्दी गाईच्या आज पास होऊ लागली. त्याच वेळेस गाय उठून उभी राहिली. बाजूलाच गाईचे वासरू आणि तिथे असलेले कुत्रे जवळच उभी होती. कुत्रे,  वासरू आणि गाय  यांचे काय नाते होते काही समजत नव्हते.आपली आई उठल्याचे पाहताच गाईच्या जवळ येऊन आईच्या तोंडाला तोंड लावल. आणि स्तनपान करू लागले.

उपस्थित तरुणांच्या मोबाईलचे नंबर पुन्हा फिरले. पुन्हा डॉक्टर तेथे आले. गायची अवस्था पाहून डॉक्टरांनी स्मित हास्य केले. पुन्हा उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी सांगताच कोणी पाणी-कोणी इंजेक्शन, कोणी सलाईन, कोणी औषधे आणण्यासाठी पळापळ सुरू झाली.पुन्हा गाईला उपचार सुरू झाले. गाईने उपचाराला साथ दिल्याने डॉक्टरांनाही गाई आता वाचणार आहे असे उपस्थितांना सांगितले. फुगलेले पोट कमी झाली होते. पुन्हा इंजेक्शन आणि सलाईन दिले गेले.

दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री दहा वाजले पर्यंत गाय जीवनाशी  दोन हात करत होती तर कुत्रे आणि गाईचे वासरू हे दोघे जण एकमेकांना साथ देत असल्याचे सर्वांनी पाहिले होते. 100% गाय जिवंत राहणार असे उपस्थित डॉक्टरांनी सर्वांना सांगितले .तिला एका झाडाला बांधून ठेवले.रात्री नंतर जेव्हा सकाळी पुन्हा गायची अवस्था पहायला तरुण गेले तेव्हा तिथे गाय व्यवस्थित दिसली तर तिचे वासरू सगळ्यांनी पाहिले.त्याच वेळेस भर थंडीत गाय जवळच कुत्रे ही तिथे होते.उपस्थित सर्वांना त्या कुत्र्याचे,वासरू आणि गाय याचे कुठल्या जन्मातले ऋनानूबंध होते हे सांगणे अवघड होते.

आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस माणुसकी विसरत चालला असे ऐकले होते परंतु शिरूर शहरात मात्र काल दुपार पासून एका गायला जीवदान मिळावे ती जिवंत रहावी म्हणून सर्व तरुण वर्गाने आठ तास प्रयत्नांची परीकास्टा केली अखेर या सर्वांच्या प्रयत्नांत व डॉक्टर यांच्या मेहनत यशस्वी झाली.एक शाळकरी मुलगा कोळपे याने  गाई ला  उठता येत नव्हते तेव्हा ती उठण्याच्या प्रयत्न करीत होती तेव्हा तो प्रयत्न कर ...प्रयत्न कर असे बोलत होता तेव्हा मात्र सगळेच जण स्तब्ध झाले आणि डोळ्याच्या कडा ओलावल्या गेल्या.

या सर्व प्रकारामध्ये शिरुर युवा मंचाचे प्रितेश गादिया,घायतडक,मयुर थोरात, मनोज तातेड, मदयकांत पानसरे, गौतम बोरा, विजय शेंडगे, देवल शहा, संतोष पटवा, आदेश बोरा, पुष्पराज कोळपकर, सनी थोरात, बंटी घायतडक, पशु वैद्यकिय डॉ.शेखर मंदिलकर, तालुका पशु वैद्यकिय अधिकारी गोरख सातकर, डॉ. नितीन कारखिले आदींनी गाईला वाचविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या