विद्यार्थ्यांच्या आठवडे बाजारात खरेदीसाठी झुंबड (व्हिडिओ)

मांडवगण फराटा,ता.११ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : "भाजी घ्या भाजी..कांदे घ्या कांदे"..असे म्हणत जोरजोरात ओरडत असणा-या चिमकुल्या शेतक-यांचा शेतमाल घेण्यासाठी झालेली गर्दी असे आगळे वेगळे चिञ मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील जि.प.प्राथमिक शाळेत पहावयास मिळाले.
मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच दैनंदिन व्यावहाराचे ज्ञान व्हावे यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यात आयोजित केलेल्या आठवडे बाजारात विद्यार्थ्यांनीच घरुन आणलेला शेतमाल,खाद्यपदार्थ,किराणा माल विक्रीसाठी ठेवला होता.

यास स्थानिक ग्रामस्थांनी भेट देउन खरेदी करुन विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास प्रोत्साहन दिले.दिवसभर भरविण्यात आलेल्या बाजारात सुमारे पंन्नास ते साठ हजारांपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.या बालआनंद मेळाव्यास जि.प.पशुसंवर्धन समिती सभापती सुजाता पवार,पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे, उपसभापती जयमाला जकाते,पं.स.सदस्य राजेंद्र गदादे,घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासो फराटे,घोडगंगेचे संचालक जगन्नाथ जगताप,संचालिका मनिषा सोनवणे,सरपंच शिवाजी कदम,उपसरपंच सुभाष फराटे, प्रतिभा बोञे, लतिका जगताप,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माउली जगताप, उपाध्यक्ष प्रशांत वेदपाठक, दत्ताञय फराटे,बन्सी जगताप, शहाजी फराटे, संभाजी फराटे, मानसिंग वाकडे आदींनी भेट देउन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या