कावरे बावरे चेहरे बॅंकेत जेव्हा जातात...

Image may contain: 16 people, people smiling, indoorविठ्ठलवाडी, ता. ११ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : 'बँकेत पैसे कसे सुरक्षित ठेवतात? ', 'स्ट्राँग रुम म्हणजे काय?', 'आमच्याकडे पैसे नसतील तर, खाते उघडता येईल काय? 'आम्हांला कर्ज मिळू शकते काय? 'इथपासुन ते 'बँकेत तुमच्यासारखे अधिकारी होण्यासाठी काय करावे लागेल? ' यांसारख्या अनेक प्रश्नांचा वेध घेत जिज्ञासापूर्वक विदयार्थ्यांनी बॅकेच्या प्रत्यक्ष कामाची माहिती घेतली.

Image may contain: one or more people and people standingविठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथील श्री. पांडुरंग विद्या मंदिर या विद्यालयाने विदयार्थ्यांना बॅंकेचे कामकाज कसे चालते याची माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांची थेट बॅंकेतच सफर घडवुन आणली.

विदयार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव यावा, बँकेचा व्यवहार कसा चालतो, बँकींग क्षेत्राची माहिती व्हावी. या उद्देशाने आज विदयालयाच्या इ.७वी. च्या वर्गातील साठ विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमेवत येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेस भेट दिली व बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली.काऊंटर, कॅशीअर केबीन, स्ट्राँग रूम, तिजोरी इ. ची प्रत्यक्ष माहिती दिली.

यावेळी साक्षी मुळे, श्रेया तळेकर, मानसी गवारी, संस्कृती गवारी,पायल गवारी, अविनाश शेलार, योगेश जाधव, अथर्व तारु, यश लोले, यशराज पाबळे इ.विद्यार्थांनी विविध प्रश्न विचारुन माहिती घेतली. तर शाखेचे अधिकारी अक्षय गवारी, शाखा व्यवस्थापक तुषार लोखंडे यांनी विदयार्थ्यांच्या प्रश्नांस समर्पक उत्तरे दिली.

यावेळी पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष संदिप गवारी व उपसरपंच जयेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतूक केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या