शिरुरच्या आखाड्यातील आव्हान-प्रतिआव्हान अन् डाव

Image may contain: 1 person, smilingशिरुर, ता.१४ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : शिरुर लोकसभा मतदार संघात आव्हान-प्रतिआव्हान दिल्यानंतर पैलवानाने टाकलेला डाव हा अनेकांना पेचात पाडणारा आहे.

शिरुर लोकसभेची निवडणुक जवळ येत असुन शिरुर लोकसभा मतदार संघात इच्छुकांची जोरदार तयारी सुरु आहे. काही इच्छुक उमेदवार या लोकसभा मतदार संघाचा अंदाज घेत असुन काहींनी सावध पविञा घेतल्याचे दिसुन येत आहे.काही दिवसांपुर्वी माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात निवडणुकिचा फॉर्म भरला तर निवडणुक जिंकुन दाखविन असे वक्तव्य केले.त्यानंतर खासदार आढळराव पाटील यांनी थेट पवारांवरच हिंमत असेल तर लढवुन दाखवावे असे म्हणत आव्हान दिले होते. या दोन्ही दिग्गज दादांनी ऐकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने राज्यभर या मतदार संघात कोण-कोणाविरुद्ध उभे ठाकणार याची चर्चा सुरु झाली.

दरम्यान, माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करत लोकसभेच्या प्रचाराची एकप्रकारे सुरुवात केली आहे. त्यांनी टाकलेल्या या डावाने माञ अनेक पेचात पडले असुन राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण याचीच उत्सुकता लागुन राहिली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ रचनात्मक दृष्टया मोठा असुन खासदार आढळराव यांचा हडपसर ते भोसरी अन शिरुर मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे ते सलग तीन टर्म निवडुन येत असुन त्यांच्या पुढे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.    

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या