किमान 153 रुपयांत निवडा कोणत्याही 100 वाहिन्या

No photo description available.
मुंबई, ता. 15 जानेवारी 2019: दूरसंचार नियामक मंडळाच्या (ट्राय) नव्या आदेशानुसार ग्राहकांना दरमहा 153.40 रुपयांमध्ये आवडीच्या कोणत्याही 100 वाहिन्यांची निवड करता येणार आहे. वाहिन्यांच्या दरमहा शुल्कासंदर्भात "ट्राय'ने अधिसूचना काढली.

31 जानेवारीपूर्वी ग्राहकांना 100 वाहिन्यांची निवड करावी लागणार असून, 1 फेब्रुवारीपासून हे दरपत्रक लागू होईल. याशिवाय "ट्राय'ने वाहिनीवरील कमाल मासिक शुल्कात 19 रुपयांपर्यंत मर्यादा घातली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होण्याची शक्‍यता आहे. ग्राहकांनी त्यांच्या आवडीनुसार वाहिन्यांची निवड करून तितकेच पैसे भरावेत, असे आवाहन "ट्राय'कडून करण्यात आले आहे. दरम्यान, एचडी वाहिन्यांच्या दरांबाबत अजूनही संभ्रम आहे. "ट्राय'च्या मते ग्राहकांनी निवडलेल्या बेस पॅकमध्ये एचडी वाहिन्यांचा समावेश नसेल, मात्र ग्राहकांना एचडी वाहिन्यांची निवड करता येईल. त्यासाठी त्यांनी केबल किंवा डीटीएच पुरवठादाराशी संपर्क करून एचडी वाहिन्यांच्या सेवा शुल्कासंदर्भात खातरजमा करणे आवश्‍यक आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या