व्हॉट्सअॅपवर शुभेच्छांसाठी असे करता येणार 'शेड्यूल'

Image may contain: one or more people and phone
शिरूर, ता. 15 जानेवारी 2019: सोशल मीडियावर माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवर आता फेसबुकप्रमाणे शेड्युल करता येणार आहे. यामुळे वाढदिवस, सण-समारंभ अथवा विशेष मजकूर अगोदरच पाठवता येणार असून, संबंधित व्यक्तीला ठरवलेल्या वेळेलाच मिळणार आहे.

सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकने व्हॉट्सऍप विकत घेतल्यापासून नेटिझन्सची गरज ओळखून सातत्याने बदल सुरू ठेवले आहेत. यामुळेच नेटिझन्सच्या पसंतीस हे ऍप उतरले आहे. वाढदिवसाबरोबरच इतर शुभेच्छा देण्यासाठी या ऍपचा मोठा वापर केला जातो. परंतु, हा दिवस आपल्याला लक्षात ठेवावा लागतो आणि त्या दिवशी मेसेज करावा लागतो. पण आता हे काम आता काहीसे सोपे होण्याची शक्यता आहे. व्हॉटसऍपला पाठवायचा मेसेज तुम्हाला शेड्यूल करता येणार आहे. सध्या ही सुविधा अँड्रॉईड वापरणाऱ्यांसाठी असेल असे सांगण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर असे काही अॅप आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अशाप्रकारे विशिष्ट वेळ आणि दिवसासाठी मेसेज शेड्यूल करता येणार आहे.

व्हॉट्सऍपवर मेसेज शेड्युल करण्यासाठी काय करालः
  • प्रथम मोबाईलवर व्हॉट्सअॅप शेड्यूलर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
  • हे अॅप इन्स्टॉल केल्यावर त्याठिकाणी उजव्या बाजूला ‘+’ चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता व्हॉटसअॅपवरील एखादा कॉन्टॅक्ट किंवा एखादा ग्रुप निवडा.
  • त्यानंतर तारीख आणि वेळ निवडा आणि किती फ्रिक्वेन्सीने हा मेसेज पाठवायचा आहे तेही निवडा.
  • मग मेसेज टाईप करुन Create बटणावर क्लिक करुन तुम्ही मेसेज शेड्यूल करु शकता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या