निमोणे, ता.१८ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : भरधाव वेगाने जाणा-या ट्रक ने रस्ता ओलांडणा-यास धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.
योगेश राजु पवार(वय२७,रा.निमोणे,ता.शिरुर) असे मयत तरुणाचे नाव असुन बापु नवनाथ गोल्हार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे येथील योगेश पवार हे रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामाला जात होते.पाळीला कामाला जात असताना कारेगाव येथील कारेश्वर चौक ओलांडत असताना पुण्यावरुन नगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने योगेशला धडक दिली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे हे करत आहेत. तरुणाच्या झालेल्या अपघाती निधनाने निमोणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.