अरेरे...ते शासकिय कार्यालय कि सार्वजनिक शौचालय ?

No photo description available.शिरुर,ता.१८ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : तालुक्यातील महत्वाचे शासकिय कार्यालय..आतमध्ये गुटख्याच्या पुड्या..सर्वञ दुर्गंधी..अन तुंबलेल्या मुता-या असे चिञ तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या निगडीत असलेल्या तहसिल कार्यालयात पहावयास मिळत असुन हे तहसिल कार्यालयातील शौचालय आहे कि सार्वजनिक शौचालय असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.

No photo description available.शिरुर,पारनेर,श्रीगोंदा या तीन तालुक्यातील लोकांच्या गरजा लक्षात घेउन माजी आमदार अशोक पवार यांच्या कार्यकाळात भव्यदिव्य प्रशासकिय इमारत उभी राहिली.त्यानंतर सर्व शासकिय कार्यालय एकाच ठिकाणी यावीत या उद्दिष्टाने या प्रशासकिय इमारतीत सर्व प्रशासकिय  कार्यालये दाखल झाली.यात महसुल विभागाचे प्रमुख असलेले तहसिल कार्यालय,पुरवठा विभाग,निवडणुक शाखा,सब रजिस्टार,सेतु केंद्र,कृषी विभाग,सहायक निबंधक कार्यालये,संजय गांधी योजना,रेकॉर्ड विभाग आदी विभागांची कार्यालये या इमारतीत आहेत.दैनंदिन कामासाठी शिरुर,पारनेर,श्रीगोंदा या तालुक्यातील हजारो नागरिक या ठिकाणी ये-जा करत असतात.यात महिला,विद्यार्थिनी,वयोवृद्ध येत असतात.त्यातील अनेकांना कामासाठी पुर्णवेळ थांबावे लागते.

Image may contain: indoorत्यासाठी त्यात पिण्यासाठी पाणी , बसण्यासाठी बाके,लघुशंकेसाठी स्वच्छतागृहे-शौचासाठी शौचालये आवश्यक आहे.माञ या प्रशासकिय  इमारतीत आजची परिस्थिती पाहिली असता,अत्यंत वाईट व दुर्दैवी अवस्थेत स्वच्छतागृहे, शौचालये, पाणी शुद्धिकरण यंञणा, बसण्याची बाके यांची झाली असुन अक्षरश : शौचालये व स्वच्छतागृहात जाणे नागरिकांना कठिण झाले आहे.

यामध्ये डोकावले असता मुता-या तुंबलेल्या अवस्थेत तर बेसिन मध्ये गुटखा खाउन पिचका-या मारलेल्या,नळ तुटुन वाया जाणारे पाणी व प्रचंड दुर्गंधी यामुळे आत जावे कि नको असा प्रश्न अनेकांना पडतो.पाणी शुद्धिकरण यंञणा हि पाणी शुद्धिकरण यंञणा राहिलीच नसुन कचरा डेपो झालाय कि काय असे वाटते.सर्व इमारतीचा कोपरा-कोपरा हा गुटखा,तंबाखु मावा खाउन थुकुन लाल केला आहे.नागरिकांना बसण्यासाठी असणारी बाके हि तुटलेल्या अवस्थेत असुन जिन्याचे रेलिंग गायब झालेले दिसुन येते.शासनाने लाखो रुपये खर्च करुन एवढी यंञणा उभारली,यंञसामग्री दिली तरीही याकडे यावर नियंञण ठेवण्यासाठी महसुल प्रशासनाला वेळ नसल्याचे वेळ नसल्याचे दिसुन येते.या संपुर्ण यंञणेवर कोणाचेच नियंञण नसल्याचे दिसुन येत असुन आओ जावो-घर तुम्हारा अशी अवस्था असल्याचे या प्रशासकिय इमारतीची झाली असुन ज्या उद्दिष्टासाठी हि इमारत बांधली गेली असुन ते उद्दिष्ट धुळिस मिळाल्याचे चिञ सध्या दिसत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या