शिरुरला जनावरांसाठी चारा छावणी सुरु...

Image may contain: one or more people and outdoorशिरुर, ता.१८ जानेवारी २०१९ (प्रतिनीधी) : चालू वर्षी दुष्काळाची दाहकता लक्षात घेता शिरुर शहरातील धारिवाल कुटुंबाच्यावतीने शिरुर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील जनावरांसाठी चारा छावणी सुरु केली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती व पालिकेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी त्यांच्या मातोश्री कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ शिरुर येथील पांजरपोळ संस्थेत दुष्काळ निवारण केंद्र छावणी सुरु केली आहे. या छावणीत शिरुर, पारनेर, श्रीगोंदा या तीन तालुक्यातील जनावरांचा सांभाळ केला जाणार आहे. हि छावणी सुरु केल्यानंतर आतापर्यंत सुमारे १०० जनावरे दाखल करण्यात आली आहे.

उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच हि गंभीर परिस्थिती निर्माण झाली असुन पावसाळा सुरु होइपर्यंत दुष्काळाची दाहकता वाढणार आहे. त्यामुळे अनेक जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झाला असुन त्यामुळे आगामी चार महिन्यांत दाखल होणा-या जनावरांची संख्या वाढणार असुन येत्या चार महिन्यांत जेवढी जनावरे दाखल होतील त्या जनावरांचा खर्च प्रकाश धारिवाल करणार आहेत. या छावणीला नुकतीच प्रकाश धारिवाल यांनी भेट दिली असुन त्यांच्या समवेत पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष रमनलाल बोरा, बांधकाम समिती सभापती अभिजित पाचर्णे, व्यापार संघाचे उपाध्यक्ष  संतोष भंडारी, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, पांजरपोळ संस्थेचे विलास कर्नावट, सुरेश बोरा, प्रकाश कोठारी, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, अशोक पवार, संतोष शितोळे आदी उपस्थित होते.

धारिवाल यांनी उभारलेल्या छावणीवर पांजरपोळ संस्था उन्हाच्या संरक्षणासाठी शेड उभारणार आहे.या चारा छावणीत दाखल केलेल्या जनावरांचा संपुर्ण पाच महिन्याच्या कालखंडात मोफत सांभाळ केला जाणार असुन दुष्काळ संपल्यानंतर ज्यांना आपआपली जनावरे परत घरी घेउन जायची आहेत, त्यांना ती परत दिली जाणार असुन ज्यांना चारा छावणीत जनावरे दाखल करायची आहेत त्यांनी ९८२२०४८५७२ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या