मलठणला एकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

शिरुर, ता. १८ जानेवारी २०१९ (प्रतिनिधी) : रांजणगाव एमआयडीसीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणा-या एकाचा मृतदेह मलठण(ता.शिरुर) येथे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दत्तात्रेय दादाभाउ कौठावळे (वय.३५, रा.मलठण, सध्या राहणार-फलकेवाडी पाबळ) असे  मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.यासंदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यत सुरु होते.

याबाबत पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी माहिती देताना सांगितले की,मयत कौठावळे हे एमआयडीसीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. ते मूळचे मलठण येथिल असून सध्या फलकेवाडीत राहतात.मलठण येथिल उदयराजे पवार यांच्या शेतात (दि.१७)रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.कौठावळे यांना जखमा झालेल्या असून यासंदर्भात पोलिस ठाण्यात सदाशिव नानाभाऊ वाव्हळ यांनी तक्रार दिली आहे. या संदर्भात शिरुर पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .

दरम्यान हे वृत्त समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक कैलास घोडके,दौडचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ.सचिन बारी यांनीही भेट दिली असून ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत सांगडे हे ही घटनास्थळी आले. या घटनेसंदर्भात आधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास घोडके करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या