अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Image may contain: one or more peopleशिरुर, ता. २० जानेवारी २०१९ (प्रतिनीधी) : अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पिडित मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडित मुली या न्हावरे येथील मल्लिकार्जुन विद्यालयात शिकत असुन दोघी शाळेकरीता जात असताना न्हावरे येथील सौरभ कदम व नवनाथ बिडगर या दोघांनी त्यांचा पाठलाग करुन वेळोवेळी वाटेत अडवुन इच्छेविरुद्ध बोलण्यासाठी दबाव टाकुन तसेच (दि.१४) रोजी पिडित मुली या शाळेला चालत जात असताना बळजबरीने आग्रह करुन त्यांच्याकडील चारचाकी गाडीत टाकुन न्हावरे कारखान्याजवळील लॉज वर नेउन विनयभंग केला असल्याचे दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध विनयभंग केल्या प्रकरणी विनयभंगाचा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे हे करत आहेत.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या