रांजणगाव ला स्ञी जन्माचे स्वागत केले अनोख्या पद्धतीने

Image may contain: 13 people, people smiling, people standingरांजणगाव गणपती, ता.२२ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथील कुटे परिवाराने स्ञी जन्मसोहळा अनोख्या पद्धतीने साजरा केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.

Image may contain: 15 people, including स्वप्निलभैय्या काटे, people smiling, people standingरांजणगाव गणपती येथील ह.भ.प शुभम नामदेव कुटे हे वारकरी सांप्रदायात कार्यशील असुन अनेक ठिकाणी ते किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातुन लेक वाचवा याबाबत प्रबोधनही करत असतात.

समाजात मुले जन्माला आल्यानंतर मोठा आनंदसोहळा साजरा केला जातो.परंतु कुटे परिवाराने त्यांच्या परिवारात ओवी हि मुलगी जन्माला आली म्हणुन आनंदोत्सव साजरा केला.या निमित्त माता-पिता पुजन सोहळा आयोजित केला होता.त्यानमित्त रामायनाचार्य रामराव ढोक  महाराज यांचे किर्तनही ठेवले होते.या आयोजित केलेल्या सोहळ्याला पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांसह नागरिकांनी हजेरी लावुन कौतुक केले.

समाजात आपण मुलगा जन्माला आला म्हणुन मोठ्या प्रमाणावर केला जाणारा आनंदोत्सव पाहिला आहे.परंतु मुलगी जन्माला आल्यानंतर केला जाणारा तिरस्कारही अनुभवला आहे.परंतु कुटे परिवाराने स्ञी जन्मोत्सव सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा केल्याने परिसरात मोठे कौतुक होत असुन समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या