शिरुर पोलीसांकडून खुनाचा गुन्हा चारच दिवसांत उघडकिस

No photo description available.शिरुर, ता.२२ जानेवारी २०१९ (प्रतिनीधी) : मलठण (ता.शिरुर) येथे संशयास्पदरित्या सापडलेल्या व्यक्तीचा खुनच झाल्याचे निष्पन्न झाले असून शिरुर पोलीसांनी अवघ्या चारच दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकिस आणला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी दिली.

याबाबत सविस्तर असे कि,रांजणगाव एमआयडीसीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणा-या दत्तात्रेय दादाभाउ कौठावळे (वय.३५, रा.मलठण, सध्या राहणार-फलकेवाडी पाबळ) यांचा मृतदेह मलठण(ता.शिरुर) येथे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ते मूळचे मलठण येथील असून सध्या फलकेवाडीत राहतात. मलठण येथिल उदयराजे पवार यांच्या शेतात (दि. १७)रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला होता व कौठावळे यांना जखमा झालेल्या आढळून आल्याने शिरुर पोलीसांना गंभीर प्रकार असल्याचे निदर्शनास आले होते.

सकृतदर्शी संशयास्पदरित्या मिळालेल्या प्रेतावरुन शिरुर पोलीसांनी गुन्ह्याची नोंद करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्याप्रमाणे तपासाची दिशा ठरवत कसोशीने माहिती गोळा करण्यास  सुरुवात केली. या वेळी तपासादरम्यान गोपनीय व तांञिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा शरद रमेश वाघ (वय.२ ३), अनिल आनंदा कळसकर (दोघेही रा. मलठण) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. सदरील दोघांनाही ताब्यात घेउन पोलीसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हयाची कबुली देत, मयत कोठवळे हा दारुच्या नशेत असताना त्याच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल आरोपींनी जबरीने चोरी केल्याने व त्यानंतर कोठावळे यांनी आरोपींना ओळखल्याने तसेच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करेल या भितीने शेतात नेऊन डोक्यात दगड टाकून खुन केल्याचे सांगितले.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना सात दिवसाची कोठडी सुनावली आहे.   

या खुनाचा गुन्हा उघडकिस आणण्याकामी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनच्या तपासपथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, रविंद्र पाटमास, रामकृष्ण साबळे, नितीन गायकवाड, संजय साळवे, मुकुंद कुडेकर, जनार्दन शेळके, संतोष औटी, करणसिंग जारवाल, पालवे यांनी महत्वाची भुमिका बजावली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या