दरोड्यातील आरोपी पुणे ग्रामीण एलसीबीकडून गजाआड

Image may contain: one or more peopleशिरूर,ता.३० जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : डोंगरगावच्या गडदे वस्तीवरील दरोडा प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिरूर येथे सापळा लावून जेरबंद केले.

सविस्तर माहिती अशी कि, डोंगरगाव येथे (दि.18 सप्टेंबर 2018) ला पहाटे गडदेवस्तीवर केरबा भिवा गडदे (वय 65) यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून गडदे व त्यांच्या पत्नी मुक्ताबाई यांना मारहाण करुन नथ व मंगळसुत्र जबरीने चोरून नेले. यावेळी मारहाणीत केरबा गडदे हे ठार झाले होते तर मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनला खुन व दरोड्यासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व लोणीकंद पोलिस  संयुक्तपणे दरोडेखोरांचा शोध घेत होते.

आरोपींचा शोध घेत असताना तपासा दरम्यान मिळालेल्या बातमीनुसार हा गुन्हा पिन्या अंकुश काळे (रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर जि. नगर) याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांवर पोलिसांवर पाळत ठेवली होती. दरम्यानया टोळीतील अजय जयाश्र्या काळे, (वय 21, रा. रांजणगाव मशीद) हा शिरूर येथे पाबळ फाट्यावर येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून अजय काळे यास जेरबंद केले. तपासात त्याचा लोणीकंद व नारायणगाव दरोड्यातही सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
   
या सराईत आरोपींवर मोकासह अनेक गुन्हे दाखल असून लोणीकंद, आळेफाटा, तसेच शिरूर पोलिसांच्या हददीतील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत दत्ता गिरमकर, राजू मोमिन, पोपट गायकवाड यांच्यासह पोलिस मित्र अन्सार कोरगु यांचा सहभाग होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या