तांदळी येथील शुभम गदादेंचे अपघाती निधन
तांदळी,ता.३ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : तांदळी(ता.शिरुर) येथील शुभम गदादे या युवकाचे अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शुभम हा पुणे येथे अभियांञिकीचे शिक्षण घेत होता.त्याचा पुणे येथे अपघात झाल्याने त्यास पुण्यातीलच खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.माञ उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली.
शुभम हा तांदळी व परिसरात चांगल्या स्वभावाने परिचित होता.त्याच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांचा तो पुतण्या होता.