मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही-राज ठाकरे

Image may contain: 6 people, people sittingशिरूर,ता.४ फेब्रुवारी २०१९(मुकुंद ढोबळे) : नरेंद्र मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजपर्यंत पाहिला नसल्याची टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगण सिद्धी येथे बोलताना केली.

लोकपाल,लोकायुक्त नियुक्त करा, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करा या मागण्यांसाठी राळेगण-सिद्धी (ता.पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस होता.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोमवार(दि.४) रोजी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.त्यानंतर 15 ते 20 मिनिटे अण्णासाहेब हजारे व राज ठाकरे यांची बंद खोली मध्ये चर्चा झाली.यावेळी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि,लोकपाल बिल पास  व्हावे म्हणून काँग्रेसला शिव्या घालणारे भाजपा सरकारने पाच वर्षामध्ये काहीच केले  नसल्याचे सांगून भाजपा सरकारने आतापर्यंत माणसे वापरली आहे आणि त्यांना सोडून देण्यात राजकारण केले.  नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवून यापुढे अण्णांनी कुठलीही गोष्ट करू नये कारण आजपर्यंत च्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी सारखा खोटारडा पंतप्रधान कधीच मी पाहिल्या नसल्याचे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.ज्येष्ट समाजसेवक आणासाहेब हजारे यांच्या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णपणे पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.अण्णांची तब्बेत खालावली असून याबाबत ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मी अण्णांना सांगितले की,नरेंद्र मोदी यांनी 18 डिसेंबर 2013 मध्ये ट्विट केले होते.लोकपाल बिल पास आले पाहिजे परंतु बीजेपी सरकारच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काहीच झाले नाही.त्या काळामध्ये काँग्रेसला शिव्या घालणारे भाजपा व नरेंद्र मोदी त्यांच्या पाच वर्षाच्या काळात काहीच केले नसल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात खोटारडे पंतप्रधान असून त्यांचे सरकारही खोटारडे असल्याची टिका राज ठाकरे यांनी केली.

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेवर आले, कोण केजरीवाल  काळा का गोरा हे जनतेला माहिती नव्हती हे लोकांना आण्णासाहेब हजारे यांच्या आंदोलनामुळे त्यांना लोकं ओळखू लागले आणि ते सत्तेत आले ते केजरीवाल साधे भेटायला येऊ शकत नाही ?. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना सत्ता केवळ अण्णासाहेब हजारे यांच्या आंदोलनामुळे मिळाली आहे. या दोघा माणसांनी अण्णासाहेब हजारे यांना वापरून घेऊन त्यांना सोडून दिले असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

यापुढे  भारतामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा विरुद्ध भारतातील जनता असा लढा  होईल त्यात कदाचित भाजपवाले सामील असतील असा टोलाही लगावताना राज ठाकरे म्हणाले की त्यासाठी एखाद्या "गडावर चा गडकरी " आपल्याला महत्वाचा असून त्याच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे सांगून गडकरी ही त्यात असतील असेच़ सूचक विधान त्यांनी नाव न घेता केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला अर्थसंकल्प निवडणुक तोंडावर ठेवून केलेला अर्थसंकल्प असून,वेगळ्या मार्गाने पैसे वाटण्याचे धोरण असल्याचे सांगून हा काय अर्थसंकल्प होता का असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. अण्णासाहेब हजारे यांनी सुरू केलेले हे अमरण उपोषण यामुळे परत देशाला चांगले दिवस येतील असा आशावाद राज ठाकरे यांनी बोलून दाखवला.

पश्चिम बंगालच्या काल झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या संघर्षाबाबत बोलताना मनसे अध्यक्ष ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी  देशांतील  स्वायत्त संस्था  हाताशी धरून राजकारण केले असून,काल पश्चिम बंगाल मध्ये झालेला पोलिस- सीबीआय यांच्यातील संघर्ष  देशातील हिताचा नसल्याचेही त्यांनी सांगून,राज्यात एखादी गोष्ट होत असेल तर त्याची जबाबदारी त्या राज्याची आहे.चाळीस लोक एखाद्या अधिकारी यांच्या कडे पाठवायची काय गरज होती असा सवाल त्यांनी केला.भाजपाच्या व नरेंद्र मोदी यांच्या सरकाच्या काळात सुप्रीम कोर्ट ते चार न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात, सीबीआय प्रमुखाची तडकाफडकी बदली केली जाते, आरबीआय चे गव्हर्नर  राजीनामा देतात हे योग्य नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या