शिरुर तालुक्यात सहा गावांना १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Image may contain: 1 person, outdoorशिरुर,ता.७ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात चालु वर्षी अत्यल्प पाउस पडल्यामुळे याचा फटका उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच शिरुर तालु्क्याच्या पश्चिम भागाला बसला असुन सध्या पाण्याअभावी १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात येत असल्याची माहिती शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार, सहायक गटविकास अधिकारी अशोक बांगर व तहसिलदार रणजित भोसले यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सहा गावांत अठरा टॅंकर सुरु करण्यात आले असुन पाबळ गावात बारा हजार लिटरच्या ७ टॅंकरद्वारे २० खेपा, केंदुर गावात ४ टॅंकरद्वारे १० खेपा, कान्हुर मेसाईला ३ टॅंकरद्वारे २ खेपा,खैरेनगरला १ टॅंकरद्वारे २ खेपा,खैरेवाडीला १ टॅंकरद्वारे २ खेपा असे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असुन मलठण,लाखेवाडी,धामारी गावठाण या गावांनी टॅंकर मागणीबाबत प्रस्ताव सादर केले आहेत तर हिवरे गावातील मांदळवाडी चा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे.

याबाबत शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि,तालुक्यात १८ टॅंकर ने पाणीपुरवठा सुरु असुन ज्या प्रमाणे गावांकडुन टॅंकरसाठी मागणी येइल त्या प्रमाणे खाञी करुन टॅंकर देण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.जे १८ टॅंकर सुरु आहेत ते केंदुर-पाबळ या जि.प.गटात सुरु असुन याबाबात जि.प.सदस्या सविता  बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि,लोकसंख्या व पशुधनानुसार या भागात टॅंकर ने पाणीपुरवठा केला जात आहे.दिवसेंदिवस उन्हाळाच्या झळा वाढत जाणार असुन त्यानुसार वाडया-वस्त्यांमध्ये पाण्याच्या १-२ खेपा वाढवायला हव्यात.पाण्याच्या बाबत कोणीही राजकारण करु नये.प्रशासन,ग्रामस्थ व अधिकारी यांनी समन्वय राखला तरच पाणीपुरवठा सुरळीत चालु शकतो असे त्यांनी सांगितले.याबाबत भास्कर पुंडे यांनी बोलताना सांगितले कि,जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करुन प्रशासनाने पाण्याच्या खेपा कराव्यात.

शिरुर तालुक्यात चालु वर्षी १६९.४४ मि.मी इतका पाउस पडला असुन त्यामुळे शिरुर तालुक्याला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.तर तालुक्यात अॉक्टोबर टाकळी हाजी मंडल मध्ये १४० मी.मी,वडगाव रासाई-९३ मी.मी,न्हावरे-१०३ मी.मी,मलठण-१४१ मी.मी,तळेगाव ढमढेरे-१६२ मी.मी,रांजणगाव गणपती-२२५ मी.मी,शिरुर-२६६ मी.मी,कोरेगाव भिमा-११० मी.मी,पाबळ-२८५ मी.मी एवढा पाउस पडला असुन या कमी पडलेल्या पाउसामुळे शिरुर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या मुग,बाजरी,तुरडाळ,मटकी,हरभरा,सोयाबीन आदी कडधान्ये पिके शेतक-याच्या हातातुन गेली.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले कि, दुष्काळामुळे कांद्याचे उत्पन्न घटले असुन पाउस नसल्यामुळे उस,कांदा या पिकांवर उन्नी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.बाजारसमितीत रब्बी व खरीप हंगामात शेतमालाची आवक ५ %टक्के इतकीही झाली नाही.एकुणच शेतक-यांचे नुकसान झाले असुन याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.सध्या उपलब्ध पाणी हे जनावरांना पिण्यासाठी व चा-यासाठी वापर करत असल्याचे दसगुडे यांनी सांगितले.शासनाने मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी दसगुडे यांनी केली.

व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी यांनी सांगितले कि,शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची दरवर्षी  जवळपास ५ कोटी रुपयांची उलाढाल होत असते परंतु चालु वर्षी अवघ्या वीस ते तीस लाखांपर्यंत उलाढाल झाली असुन यामुळे याचा परिणाम शिरुर शहरातील बाजारपेठेवर झाला असुन यावर अवलंबुन असलेले किराणा,कपडे,हमाल व इतर व्यापारी यावर परिणाम झाल्याचे भंडारी यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या