शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे सहा प्रबळ उमेदवार कोण?

Image may contain: 2 people, people smiling, people standing
शिरूर, ता. 9 फेब्रुवारी 2019: शिरुर लोकसभा मतदारस संघात शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निवडणूक लढविण्याची गरज नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करताना या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे सहा प्रबळ उमेदवार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे या मरदारसंघात राष्ट्रवादीचा 'ते' सहा उमेदवार कोण ? याची उत्सुकता आहे.

शिरुर येथे एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी मी जर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा फॉर्म भरला तर या मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवील अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर शिरुर लोकसभेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणताहेत तर त्यांनी हिंमत असेल तर लढुन दाखवावेच. शिरुर लोकसभा मतदारसंघातुन अजितदादांना पराभुत केले नाही तर मराठ्यांची अवलाद सांगणार नाही अशा शब्दांत थेट अजित पवारांनाच खुले आव्हान दिले होते. या दोन दिग्गज दादांनी एकमेकांना शड्डु ठोकत आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने शिरुर मतदारसंघासह राज्यभर चर्चेला उधान आले आहे.

शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे शिरुर लोकसभा मतदार संघात सलग तीन टर्म खासदारपदी निवडुन आले आहेत. आढळराव यांचा शिरुरसह भोसरी, हडसपर परिसरातही चांगला संपर्क आहे. राष्ट्रवादीला सलग तीन वेळा या मतदारसंघात हार पत्कारावी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या पुर्वी शिरुर ला झालेल्या विविध कार्यक्रमांतुन सातत्याने तशी खंतही व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची शिरुर लोकसभेबाबत वारंवार चर्चा होतेय.त्यामुळे आढळराव पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार उभा राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले तर लढणार, अशी प्रतिक्रिया भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिली आहे. दुसरीकडे नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणा-या अन ऐनवेळीस धांदल उडविणा-या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करून करत आहेत. बांदल हे शिरुर, आंबेगाव सह लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी दिसुन येत असून, या मैदानात सर्वात आधी उतरले असून यातही धांदल उडवणार कि काय? असा सवाल केला जात आहे.

आजपर्यंत मी कधीच कोणाकडे काही मागितलं नसुन वेळ आल्यावर माञ मला विसरु नका अशी प्रेमळ भावनिक साद जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे ठिकठिकाणच्या सार्वजनिक कार्यक्रमात सर्वसामान्यांना घालत असुन सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ही प्रदिप कंद यांचीच चर्चा चांगलीच सुरु झाली आहे.

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार हे पक्षाने अद्याप जाहिरे केले नसले तरी राष्ट्रवादीचे सहा प्रबळ उमेदवार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. यामुळे नेमके सहा उमेदवार कोण? आणि कोणाला संधी मिळणार? यावर शिरूर तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या