इनामगावचा शुभम जगताप ठरला शिरुर केसरी (Video)

वडगाव रासाई, ता.११ फेब्रुवारी २०१९ (सतीश केदारी) : इनामगावचा शुभम जगताप हा शिरुर केसरी तर शुभम परदेशी हा उपविजेता ठरला. महिलांच्या गटात प्रितम दाभाडेने शिरुर केसरी पटकावत शिरुर च्या कुस्ती खेळात इतिहास घडविला.
वडगाव रासाई येथे शिरुर तालुका मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्हयातुन मल्लांनी सहभाग नोंदविला. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच महिला गटात शिरुर मल्लसम्राट साठी आयोजन करण्यात आले होते.

अंतिम सामन्यात पुरुषांच्या गटात इनामगावच्या शुभम जगताप ने प्रतिस्पर्धी कोरेगाव भिमाच्या शुभम परदेशीवर पकड राखत गुण मिळवत शिरुर केसरीचा किताब पटकाविला.महिलांच्या गटात गणेगाव दुमालाच्या प्रितम नवनाथ दाभाडे हिने भांबर्डे येथील प्रतिस्पर्धी मनिषा संतोष पिंगळेवर वर्चस्व मिळवत शिरुर मल्लसम्राट चा किताब पटकाविला.

पुणे जिल्हा कुस्तीगिर संघ व वडगाव ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले.स्पर्धा निरीक्षक म्हणुन किसनराव बुचडे व मेघराज कटके यांनी काम पाहिले. यावेळी शिरुरचे खासदार शिवाजी आढळराव पाटील, शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, जि.प चे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी जि.प. अध्यक्ष प्रदिप कंद, माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, जि.प सदस्य राजेंद्र जगदाळे, जि.प.सदस्य रेखाताई बांदल यांसह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे- पुरुष गट

 • २८ किलो वजनगट- दिगंबर थोरात (वाघाळे-प्रथम), ओंकार अनिल जाधव (द्वितीय-न्हावरा)
 • ३१ किलो वजनगट- प्रशांत रुपनेर (गारकोलवाडी-प्रथम), साई संभाजी उमाप (द्वितीय-जातेगाव)
 • ३८ किलो वजनगट- अमित गंगाराम कुलाळ (अरणगाव-प्रथम), प्रतिक रामदास मचाले (द्वितीय-इनामगाव)
 • ४५ किलो वजनगट- सार्थक ज्ञानेश्वर फडतरे (कोरेगाव भिमा-प्रथम), गणेश सरके (द्वितीय-न्हावरा)
 • ५२ किलो वजनगट- राहुल यशवंत हरगुडे (सणसवाडी-प्रथम), दत्ताञय रुपनवर (द्वितीय-न्हावरा)
 • ६० किलो वजनगट- गणेश ज्ञानदेव जाधव (न्हावरा-प्रथम), पवन भाउसाहेब सोनवणे (द्वितीय-निर्वी)
 • ६६ किलो वजनगट- प्रताप धर्मा पिंगळे (पाबळ-प्रथम), महेश मोहन कोळपे (द्वितीय-मलठण)
 • ७५ किलो वजनगट- कुलदिप संतोष इंगळे (इंगळेनगर-प्रथम), गणेश बन्सी चोरे (द्वितीय-डोंगरगण)
महिला गट
 • ४० ते ४८ किलो वजनगट- शशिकला सुदाम बिडगर (उरळगाव-प्रथम), श्वेता  राजेंद्र डफळ (द्वितीय-धामारी)
 • ४८ ते ५५ किलो वजनगट- वर्षा काळू भालेराव (इनामगाव-प्रथम), संध्या प्रकाश भोंगळे (द्वितीय-मांडवगण फराटा)
 • ५५ किलो वजनगट  प्रितम नवनाथ दाभाडे (शिरुर मल्लसम्राट-गणेगाव दुमाला), मनिषा संतोष पिंगळे (भांबर्डे, उपविजेता)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या