वडनेर ला सैरभैर झालेला बिबट्या केला जेरबंद

No photo description available.वडनेर खुर्द,ता.१२ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : वडनेर खुर्द येथे रविवारी (दि.१०) रोजी दिवसभर शेतात सैराट होऊन सैरभैर झालेल्या बिबट्याला स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसाने तसेच पोलिसांच्या सहकार्याने सायंकाळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने भूल देऊन जेरबंद केल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

Image may contain: one or more peopleरविवारी सकाळी वडनेर येथे ऊसाच्या शेतात बिबट्या असल्याची बातमी गावात पसरल्यावर गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली.शिरूर वनविभागाला कळवल्यानंतर शिरूर वनविभागाचे अधिकारी व वनरक्षक व कर्मचारी घटनास्थळी आले. बिबट्याला वनविभागाने त्वरित जेरबंद करण्यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके व कर्मचाऱ्यांना पाचारण केले.

जुन्नर वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी हजर झाली.संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमली होती.दिवसभर या शेतातून त्या शेतात  सैराट झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी स्थानिक नागरिक वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते.

त्यामुळे आजूबाजूला असलेल्या संतोष शंकर निचित, रामदास दामू निचित, अंकुश बबन निचित या शेतकऱ्यांच्या घास, कांदा ,उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.सायंकाळी साडेसहाच्या सुमारास साळभाऊ सिताराम निचित यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्यांना जखमी केले.त्यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला धरून ठेवले.

नंतर प्रदीप राधु निचित व योगेश रोहिदास निचित,विजय रामदास निचित,यांनी गोणी व पोत्याने बिबट्याला पकडून धरला.माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे डॉ.अजय देशमुख यांनी बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात जेरबंद केले. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलवले आहे.अनिल वाजे ,दत्ता लक्ष्मण निचित याच्यावर हल्ला केला मात्र सुदैवाने वाचले,आप्पसाहेब बाबुराव निचित यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

बिबट्याला पकडण्यासाठी गणेश जनार्धन निचित,नवनाथ ठाकराम निचित,राहुल कापसे,तुषार निचित,संदीप बबन निचित, निवृत्ती निचित, आदिनाथ निचित, निखिल निचित, माऊली निचित, ज्ञानेश्वर साळभाऊ निचित,सुभाष जनार्धन निचित,  ज्ञानदेव राऊत, राजेंद्र बोऱ्हाडे या नागरिकांनी धाडस दाखवले.या धाडस केलेल्या तरूणांचे परिसरातून कौतुक होत आहे.दरम्यान जखमी निचित यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे या परिसरात शेतीसाठीचा वीजपुरवठा दिवसा देण्याची मागणी व या परिसरात पिंजरे लावण्याची मागणी साईक्रांती प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आली आहे. महावितरणला याबाबत निवेदन देण्यात येणार असून बदल न केल्यास प्रतिष्ठान चे अध्यक्ष विक्रम निचित, नवनाथ ठकराम  निचित, अनिल वाजे,विजय निचित यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या