जांबुतला अनैतिक संबंधातून महिलेने केला महिलेचा खून

Image may contain: foodशिरुर,ता.१३ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : पतीच्या अनैतिक संबंधाच्या होणा-या ञासाच्या रागातुन महिलेने मुलाच्या सहाय्याने  महिलेचा खुन करण्यात आल्याची घटना जांबुत (ता.शिरुर) येथील मोरातवस्ती, शरदवाडी येथे घडली.

चंद्रभागा नरेंद्र गाडेबैल (वय.४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जयश्री मच्छिंद्र कदम  (रा. शरदवाडी, जांबूत) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार व फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मयत चंद्रभागाचा पती नरेंद्रचा २००२ साली मृत्यु झाला होता, त्यापुर्वी पासुन चंद्रभागा हिचे मच्छिंद्र गंगाराम कदम याचेबरोबर अनैतिक संबंध होते. याबाबत चंद्रभागाला घरी समजावुन सांगितले होते तर मच्छिंद्र हा घरी मुलांना व पत्नीला मारहान करायचा. जयश्री हि या ञासाला कंटाळली होती. (दि.१०) रोजी आरोपी जयश्री व मुलगा हे चंद्रभागाच्या घरी जाउन हातातील लाकडी दांडक्याने मारहान करत खोलीमध्ये घेउन गेले. त्यानंतर  घटना समजताच गाडेबैल कुटुंबियांनी उपचारासाठी जांबुत येथील दवाखान्यात दाखल केले. परंतु उपचारांपुर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले अशी फिर्याद गाडेबैल कुटुंबियांनी शिरुर पोलीस स्टेशनला दिली आहे.

याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला खुनाचा दाखल करण्यात आला असुन आरोपी जयश्री मच्छिंद्र कदम या महिलेस पोलीसांनी अटक केली असुन अल्पवयीन मुलाची चौकशी सुरु असल्याचे शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी सांगितले पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या