न्हावरे ग्रामस्थांनी जपली अशीही माणुसकी

न्हावरे, ता.१६ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : शेकडो मैल दुर येउन सेवाभावीवृत्तीने रुग्णसेवेचे काम करणा-या त्या डॉक्टरच्या पश्चात कुटुंबियांना ग्रामस्थांनी मदतीचा हात देत माणुसकिचे अनोखे दर्शन घडविले.
 
सविस्तर असे कि,डॉ. निर्ब्बन निर्मल रॉय (वय 48) हे मूळचे पश्‍चिम बंगाल येथील होते. मागील सुमारे वीस वर्षांपासून ते परिसरातील न्हावरे, आलेगाव पागा, रांजणगाव सांडस, उरळगाव परिसरात ते मूळव्याध व भगेंद्राची व्याधी असणाऱ्या रुग्णांवर व्यवसाय दृष्टिकोन बाजूला ठेवून उपचार करायचे. त्यांनी कोणत्याही रुग्णाला पैशासाठी माघारी पाठवले नव्हते. या निःस्वार्थी कामामुळे त्यांचा परिसरात लोकसंग्रह मोठ्या प्रमाणात होता. मात्र, त्यांना उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
 
डॉ. रॉय यांच्यावर मृत्यूनंतर ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले परंतु 
त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी, या भावनेतून बुधवारी दशक्रियाविधीच्या दरम्यान ऍड. महिपती काळे, पोलिस कर्मचारी संभाजी घाडगे यांनी डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले. यादरम्यान ग्रामस्थांच्या माध्यमातून सुमारे आर्थिक मदत गोळा करण्यात आली. ती रक्कम ग्रामस्थांनी डॉ. रॉय यांच्या पत्नी पौर्णिमा यांच्याकडे सुपूर्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या