'जवान चंदू चव्हाण' पुस्तकाचे संरक्षण मंत्र्यांकडून कौतुक

Image may contain: 9 people, people standing
शिरूर, ता. 18 फेब्रुवारी 2019: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस) या पुस्तकाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कौतुक केले. जवान चंदू चव्हाण यांनी डॉ. भामरे यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना पुस्तक दिले.

जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये चुकून गेले नव्हते तर ते खरे कारण वेगळे होते. चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस होते. पाकिस्तानमध्ये छालेल्या छळावर व जीवनावर आधारीत पत्रकार संतोष धायबर यांनी पुस्तक लिहीले असून, पुणे येथील ईश्वरी प्रकाशनने ते प्रकाशीत केले आहे. जवान चंदू चव्हाण यांनी डॉ. भामरे यांची भेट घेऊन पुस्तक भेट दिले. प्रेरणादायी असलेल्या पुस्तकाचे डॉ. भामरे यांनी कौतुक केले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

चंदू चव्हाण यांच्या सुटकेमागे डॉ. भामरे यांचे मोठे योगदान आहे. पुस्तकामध्ये डॉ. भामरे यांनी दिलेली सविस्तर माहिती आहे. शिवाय, त्यांनी प्रस्तावनाही दिली आहे. मराठी व हिंदी भाषेमध्ये हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. मराठी आवृत्तीचे 21 जानेवारी 2019 रोजी प्रकाशन झाले. शिवाय, www.chanduchavan.com ही वेबसाइटही तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, 'जवान चंदू चव्हाण..' या पुस्तकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, देशभरातून पुस्तकाला मागणी आहे. www.chanduchavan.com या संकेतस्थळावरून पुस्तकाची नोंदणी करता येते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या