अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

Image may contain: one or more peopleमांडवगण फराटा,ता.१९ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन अत्याचार केल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. विलास अर्जुन थोरात (रा.मांडवगण फराटा,ता.शिरुर) असे आरोपीचे नाव आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती कामानिमित्त बाहेर गेले असता, फिर्यादी महिला व मुले घरी एकटीच होती. यानंतर पिडित मुलीची आई कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता आरोपी विलास याने संधी साधत अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहुन पिडित मुलीशी अश्लील चाळे व लज्जास्पद वर्तणुक केली. यानंतर पिडित मुलीची आई घरी आली असता, पिडित मुलीने आरोपी विलास याने केलेल्या दुष्कृत्याची माहिती आपल्या आईला दिली.पिडित मुलीच्या आईने शिरुर पोलीस स्टेशनला धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलीस स्टेशनला आरोपी विलास विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करत आहेत. आरोपी विलास यास शिरुर न्यायालयात हजर केले असता सोमवार दि.२२ पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पालवे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या