पाकिस्तानला आत घुसून मारूः जवान चंदू चव्हाण

Image may contain: 1 personपुणे, ता. 19 फेब्रुवारी 2019: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शूरवीर 42 जवान हुतात्मा झाले. आम्ही याचा बदला पाकिस्तानमध्ये घुसून घेऊ. पाकिस्तानला आत घुसून मारू, असे पाकिस्तानमधून भारतात आलेले जवान चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे. चव्हाण यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे की, 'पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचे शूरवीर 42 जवान हुतात्मा झाले. जवान हुतात्मा झाल्यापासून आमचे जवानांना जेवण जात नाही. आमच्या कुटुंबातील जवान हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की,  आम्ही जरूर बदला घेऊ. प्रत्येक गोष्टीचा हिसाब चुकता करू. पाकिस्तान खोटे बोलत आहे. पण, हे सरकार आता हे होऊ देणार नाही. पाकिस्तानला आत घुसून मारू.'

'गेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये तर मी नव्हतो. पण, सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर मी पकडलो गेलो. पाकिस्तानमधील अंधाऱया कोठडीत 3 महिने 21 काढावे लागले. या कालावधीमध्ये माझा त्यांनी अतोनात छळ केला. माझ्या देशापासून 3 महिने 21 दिवस दूर राहिलो. दरम्यानच्या काळात त्यांनी माझ्याकडून नको ते व्हिडिओ तयार करून घेतले. मला आता हा सगळ्या गोष्टीचा हिसाब पुर्ण करायचा आहे. पाकिस्तानला सांगू इच्छितो, आमचे सरकार, आमचे लष्कर कमजोर नसून, जरूर प्रत्युत्तर देणार. आत घुसून मारू. आमचे सरकार दुष्मन देशातून मला परत आणू शकते तर हुतात्मा झालेल्या जवानांचाही बदला घेऊ शकते,' असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान आमच्या देशाला तोडण्याचे प्रयत्न करत आहे. पण, सरकार हे होऊ देणार नाही. काश्मीरमधील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, पाकिस्तान काश्मीरमध्ये विष पसरवत आहे. पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष करायला हवे. आपण एक होऊन उभे राहू. आम्ही आमच्या देशासाठी जगत आहोत, आमच्या देशातील प्रत्येकजण आमच्या पाठिशी उभे आहेत. आम्ही जरूर बदला घेऊ. 3 महिने 21 दिवसाचा बदला घेणार.... जय हिंद...

दरम्यान, जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडल्याच्या धक्क्यानंतर चंदूच्या आजीचा धक्क्याने मृत्यू झाला होता. चंदू यांची पाकिस्तानमधून सुटका करण्यासाठी भारत सरकार, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नामुळे ते 3 महिने 21 दिवसानंतर भारतात आले.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या