सकाळी वडीलांवर अंत्यसंस्कार; दुपारी बारावीचा पेपर

Image may contain: 1 person, closeup
करडे, ता. 22 फेब्रुवारी 2019: सकाळी वडीलांवर अंत्यसंस्कार करून आल्यानंतर वडीलांचे छत्र हरपल्याचे दुःख असतानाही खचून न जाता दुपारी बारावीचा पेपर दिला. प्रियांका दादा गायकवाड असे या विद्यार्थिनीचे नाव.

प्रियांका ही करडे येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत आहे. बुधवारी (ता. 20) तिचे वडील दादा शंकर गायकवाड (वय 70) यांना पक्षाघात व हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना पुण्यात ससूनमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री गायकवाड यांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. 21) सकाळी गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रियांकाचा आज बारावीचा पहिलाच इंग्रजीचा पेपर होता. मात्र, पित्याचे छत्र हरपल्यामुळे प्रियांका खचली होती. तिचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष देशमुख यांनी प्रियांकाला धीर दिला. प्रियांकाची परीक्षा देण्याची मानसिकता बनविली व गाडीची सोय करून तिला न्हावरे येथील परीक्षा केंद्रावर पोचविले. प्रियांकाने परीक्षेचा पेपर दिला. यावेळी न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण व केंद्रप्रमुख अण्णासाहेब धडस यांनीही प्रियांकाला धीर दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या