शिरुरला रोमहर्षक सामन्यात प्रदिपदादा कंद फायटर्स विजयी

Image may contain: 12 people, people smilingशिरूर,ता.२३ फेब्रुवारी २०१९(मुकुंद ढोबळे) : शिरूर येथे माजी नगराध्यक्ष  रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत  प्रदीपदादा कंद फायटर्स, लोणीकंद या संघाने प्रथम क्रमांक मिळून पी आर डी चषकाचा मानकरी ठरला तर महाराजा प्रतिष्ठाण आण्णापूर हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

शिरूर येथे नगरसेवक रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित मा.नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पंचायत समिती माजी उपसभापती राजेंद्र जासूद, संपदा पतसंस्थाचे अध्यक्ष प्रभाकर डेरे,आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, संतोष भंडारी, बांधकाम व्यवसायिक सुभाष गांधी, शिवसेवा मंडळ विश्वस्त श्रीनिवास परदेशी, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, नगरसेवक अभिजित पाचर्णे,स्पर्धेचे आयोजक रविंद्र ढोबळे,स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे, चेतन कुरुंदळे, मुजफ्फर कुरेशी, अभिजित पाचर्णे, विठ्ठल पवार नितीन पाचर्णे, सुनीता कुरुंदळे, मनीषा कालेवार, संगीता मल्लाव,दादासाहेब गवारे,राजेंद्र ढोबळे,नसीम खान,श्रीकांत पाचुंदकर, युवा नेते स्वप्नील गायकवाड, आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, संतोष भंडारी, बांधकाम व्यवसायिक सुभाष गांधी,जयसिंग धोत्रे ,कुंडलिक शितोळे, रंजन झांबरे,फिरोज शेख,अमजद सौदागर,सनी दळवी,संतोष शिंतोळे,गुलाम पठाण, फिरोजभाई बागवान, सागर ढवळे, रावसाहेब चक्रे, पंच दिपक पिळगावकर, दत्ता पवार, राहुल पवार,रविंद्र जाधव, पंच दगडू त्रीमुखे, पोपट चव्हाण, शफीकभाई शेख,अजय ढोबळे,विजय ढोबळे, बाळासाहेब राजगुरू, तेजस माने, ऋतीक ढोबळे,सतीश व्यवहारे  व मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.या स्पर्धेचा अंतिम सामना पहाण्यास शिरूर शहर व तालुक्यांतून दहा हजार प्रेक्षक उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रदीप कंद फायटर्स लोणीकंद, द्वितीय क्रमांक महाराजा प्रतिष्ठाण आण्णापूर, तिसरा क्रमांक सांगवी पुणे, चतुर्थ क्रमांक मानकरी ठरला नामदेव पडवळ वारीयर्स  आळेफाटा संघ,तर मॅन ऑफ द सीरिज़ करिता स्प्लेंडर मोटर सायकल ठेवण्यात आली होती त्याचा मानकरी सांगवी पुणे संघाचा आनंद चव्हाण हा ठरला आहे.तर बेस्ट बॉलर तेजस शिवले,बेस्ट विकेट कीपर  भरत कर्डिले,बेस्ट फलंदाज गणेश जाधव यांनी किताब मिळवला..स्पर्धेतील उत्कृष्ठ झेल गणेश महाकाळ, सलग तीन षटकार करण पेंढारकर, सलग तीन चौकार आनंद चव्हाण, सलग तीन व्हिकेट करण पेंढारकर  या सर्व विजेत्यांना रौलेक्स घड्याळ, स्म्रुती चिन्हाने  गौरवण्यात आले.

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कद म्हणाले की, शिरूर तालुक्यात होणारा उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल चषक करंडक स्पर्धा हिं शिरूर तालुक्यातील खेळाडू साठी प्रोत्साहन देणारी स्पर्धा असून आयोजक माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, प्रशांत शिंदे यांचे कौतुक करावे एवढी मोठी स्पर्धा त्यांनी भरवली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या