शिरूरमध्ये जाळला पाकिस्तानचा झेंडा (Video)

Image may contain: 1 person, standing
शिरुर, ता.२३ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध करुन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला तर शिरूर हुतात्मा स्मारकाजवळ पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.

हा कँडल मार्च छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून बाजार समितीच्या आवारातून सुरु झाला. संपूर्ण शिरूर शहरातून फेरी मारल्या नंतर शिरूर येथील हुतात्मा स्मारका जवळ मेणबत्त्या पेटवून शहीद जवान यांना श्रध्दाजली वाहण्यात आली.

यात पुणे जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समितीचा सभापती सुजाता पवार, बाजारसमितीचे सभापती  शशिकांत दसगुडे, मेजर दशरथ गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई मांढरे, जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, शहराध्यक्ष नगरसेवक मुझफ्फर  कुरेशी, शिरुर शहर युवकचे अमोल चव्हाण, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, तालुका अध्यक्षा  पल्लवी शहा,बाबासाहेब सासवडे, मोनिका हरगुडे,  अँड शिरीष लोळगे, ॲड.रवींद्र खांडरे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव, रंजन झांबरे, मनीषा कालेवार, कामिनी बाफना, अपर्णा शहा, रवींद्र खांडरे यांचे सह नगरसेवक, नगरसेविका सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हा मार्च गेला. हुतात्मा स्मारक येथे मार्चची समाप्ती झाली.येथे पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार अशोक पवार म्हणाले की पुलवामा येथे शहीद जवानांच्या मागे संपूर्ण देश उभा असून, या हल्याचा निषेध करून याचा बदला घ्यावा अशी सर्व भारतीयांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी माजी मेजर दशरथ गायकवाड म्हणाले की पुलवामा हल्याचे उत्तर देण्यासाठी भारतीय जवान तयार असून, केवळ दहशतवादी नाहीतर त्यांना पोसणारे पाकिस्तान राष्ट्र संपवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पुलवामा मधील शहीद जवान यांच्या बदला लवकरात लवकर घ्यावा त्यासाठी वेळ आली तर आम्ही रिटायर्ड जवान पुन्हा सीमेवर जाण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या