कंटेनरचे चाक डोक्यावरुन गेल्याने एकाचा मृत्यु

No photo description available.शिरुर,ता.२४ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : शिरुर-चौफुला रस्त्यावर करडे(ता.शिरुर) जवळ कंटेनरच्या धडकेने चाकाखाली येउन एकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.

या प्रकरणी सुमित दत्ताञय गोडबोले यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.तर या अपघातात आशिष पांडुरंग कांबळे(वय.२८,रा.काझड,ता.इंदापुर) असे दुर्दैवी मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी सुमित व आशिष कांबळे हे दोघे शिरुर कडे दुचाकी(एम.एच.४२.जे ८९०३) वर जात असताना करडे गावानजीक दोन कि.मी अंतरावर आले असता,शिरुर कडुन चौफुला दिशेने जाणारा कंटेनर (एम.एच.४५ १६६३) ने दुचाकीस उजव्या बाजुची पाठीमागील बाजुची धडक बसल्याने कंटेनरचे पाठीमागील चाक आशिष याच्या डोक्यावरुन गेल्याने आशिष याचा जागीच मृत्यु झाला.

तर फिर्यादी सुमित रस्त्याच्या बाजुला पडल्याने गुडघ्याला,पायाला व हाताला दुखापत झाली.अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या