पत्रकारांच्या वतीने पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान

Image may contain: 11 people, people smiling, people standing, people sitting and indoorशिक्रापुर,ता.२४ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी)  : कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमात चोख पोलीस बदोबस्त ठेवणा-या पोलीस अधिका-यांचा शिक्रापुरच्या पञकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमात चोख पोलीस बंदोबस्त ठेवून महाराष्ट्रभरातून अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांना नियोजनबद्धरीत्या चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरविल्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. परिसरातील नागरिकांनीही पोलिसांना चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. पोलिसांच्या चोख कामगिरी बद्दल शिक्रापूर परिसरातील पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी यांच्यासह १७ कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

शिक्रापूर परिसरातील पत्रकारांच्या वतीने सन्मानित करण्यात आलेले शिक्रापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी पुढीलप्रमाणे :- पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, शिवशांत खोसे, मनोज निलंगेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर, पोलीस हवालदार सुरेश कांबळे, दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, संदीप जगदाळे, अनिल जगताप, ब्रह्मानंद पोवार, अनंता बाठे, विजय गाले, पोलीस कॉन्स्टेबल तेजस रासकर, योगेश नागरगोजे. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे राज्याचे कोषाध्यक्ष शरद पाबळे, जिल्हा सचिव रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष  सुनील भांडवलकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष शेरखान शेख, शिरूर तालुका पत्रकार संघाचे सचिव प्रा. एन.बी. मुल्ला, ज्ञानेश्‍वर मिडगुले, प्रा. नागनाथ शिंगाडे, राजाराम गायकवाड, नंदकुमार शहाणे, विठ्ठल वळसे, गजानन गव्हाणे, प्रमोद कुतवळ तसेच परिसरातील पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले की पोलिस व पत्रकार  यांच्यातील योग्य समनव्यामुळेच कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेरखान शेख यांनी केले. प्रविण जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. संजय देशमुख यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या