पाचुंदकर यांच्या मालमत्तेचा बँकेकडून ताबा (Video)

रांजणगाव गणपती, ता. 24 फेब्रुवारी 2019 (प्रतिनिधी): चंद्रशेखर राजाराम पाचुंदकर यांच्या मालमत्तेवर शुक्रवारी (ता. २२) जी एस महानगर को.ऑप. बँक.लि.या बँकेने कर्जाची परतफेड न केल्याने प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मे. राजमुद्रा थर्माकॉल पॅकेजिंग प्रा.लि. तर्फे संचालक चंद्रशेखर राजाराम पाचुंदकर व रंगनाथ दशरथ जगताप यांनी जी एस महानगर को.ऑप.बँक लि.मुंबई, चंदननगर शाखेकडून ३ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज काही दिवसांपूर्वी घेतले होते. परंतु, या कर्जाची वेळेवर परतफेड न केल्याने बँकेने सिक्युरिटायझेशन ऍक्ट २००२ मधील कलम १३(२) व १३(४) नुसार जी एस महानगर को ऑप बँक लि. मुंबई यांनी अधिकृतरीत्या कर्जासाठी गहाण ठेवण्यात आलेली मालमत्ता (Register Mortgage Deed) चंद्रशेखर पाचुंदकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई राजाराम पाचुंदकर यांच्या नावे आहे. त्यानुसार रांजणगाव गणपती येथील एचपी पेट्रोल पंपा समोरील मिळकत गट नं १८०७/२ (१६,१४६ चौ.फुट) आणि त्यावरील बांधकाम (२८०० चौ.फुट) असलेली मालमत्ता शुक्रवारी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेश क्र. सिक्यु/एसआर/३१५/२०१५ नुसार शिरुरचे नायब तहसिलदार यांच्या समवेत जी एस महानगर को ऑप बँक लि. च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करुन मालमत्तेवर प्रत्यक्ष ताबा घेतला.

दरम्यान, पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या