रामदास आठवलेंच्या कवितेला खासदार-आमदारांची दाद

शिरुर, ता. २४ फेब्रुवारी २०१९ (सतीश केदारी) : "शिरुर ला मी आज केल्यामुळे स्पर्श...आढळराव पाटलांना का होणार नाही हर्ष.." "म्हणूनच शिरुर कडे घेतलेली आहे मी धाव..अन आढळरावांच्या विरोधकांचा उद्धवस्त करणार आहे मी डाव" अशा प्रकारच्या चारोळ्या केंद्रिय मंञी रामदास आठवले यांनी सादर करताच त्यांच्या कवितांना खासदार आढळराव पाटील अन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी चांगलीच दाद दिली.
शिरुर येथे एका कार्यक्रमासाठी केंद्रिय मंञी रामदास आठवले हे आले असता त्यांनी खुमासदार शैलीत चारोळया सादर केल्या.उपस्थितांनीही त्याला चांगलीच दाद दिली.या वेळी शिरुर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार बाबुराव पाचर्णे,नगराध्यक्षा वैशाली वाखारे, भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते.

या प्रसंगी भाषणाच्या सुरुवातीपासुन आपल्या खुमासदार शैलीत चारोळया सादर केल्या. "पासपोर्ट अॉफिस मुळे आज मला होत आहे हर्ष...२०१९ आहे नरेंद्र मोदींचे वर्ष.., "शिरुर ला मी आज केल्यामुळे स्पर्श...आढळराव पाटलांना का होणार नाही हर्ष ", "कॉंग्रेस चे असतील थरुर पण सेना भाजप अन आरपीआय चं आहे शिरुर", "मी आहे सेना भाजपच्या मधी मला मिळणार माझी सीट कधी","शिरुर आहे ज्यांचं गांव..त्यांच नाव बाबुराव, म्हणुनच शिरुरकडे घेतलेली आहे मी धाव..अन आढ़ळरावांच्या विरोधकांचा उद्ध्वस्त करणार आहे मी डाव", "सेना भाजपा ला एकञ आणणारा मी आहे हिरो...कारण संपुण टाकलेलं आहे कॉंग्रेस राष्ट्रवादीचा ब्युरो".या चारोळ्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या