शिरुरला घरफोडीत ४५ हजारांचा ऐवज लंपास

No photo description available.शिरुर,ता.२५ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : शिरुरला घरफोडी करुन चोरट्यांनी सुमारे ४५ हजार दोनशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी सोनाली दत्ताञय करंजुले यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी सोनाली यांचे पती जम्मु-काश्मिर येथे सी.आय.एस.एफ येथे नोकरीस असुन ते सासु-सासरे व मुलांसोबत स्टेट बॅंक कॉलनी,इंद्रधनुष्य येथे राहण्यास आहे.सासु-सासरे हे मुळ गावी गेल्याने फिर्यादी या त्यांच्या मुळ गावी पाडळी (ता.पारनेर) येथे घर लॉक करुन (ता.२३) रोजी कामानिमित्त गेल्या होत्या.

रविवारी (दि.२४) त्यांच्या समोर राहणारे चोरमले यांनी फिर्यादी यांना तुमच्या घराचा लॉक तोडला असल्याचे व दरवाजा उघडा  असल्याचे सांगितले.यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे सासु-सासरे यांनी घरी येउन पाहिले असता घराचे लॉक अज्ञात व्यक्तीने तोडले असल्याचे दिसले.घरात पाहिले असता,कपाटाचे लॉक तोडलेले होते.या चोरीत २० हजार रुपये किंमतीचा दिडतोळ्याचा लक्ष्मीहार, १० हजार रुपये किंमतीचे १ तोळे वजनाचे मंगळसुञ,१५०० रुपयांचे लहान मुलांचे कानातील डुले,७०० रुपये किंमतीचे दोन पायातील पैंजन, रोख ३ हजार रुपये असे मिळुन एकुण ४५ हजार दोनशे रुपये किंमतीचा ऐवज व कागदपञे अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रविंद्र पाटमास हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या