गोलेगाव ला विविध कार्यक्रमांनी विज्ञान दिन साजरा

Image may contain: 3 people, people sittingगोलेगाव,ता.१ मार्च २०१९(प्रतिनीधी) : गोलेगाव येथे आय टी शी मिशन सूनहरा कल च्या व प्रथम एज्यूकेशन फौंडेशन च्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

त्या निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये मुलांने बनवलेली विविध मॉडेल, अनिस चे नवनाथ लोंढे सर यांचे प्रयोग, मुलाची विज्ञान विषयावर भाषणे यांचा समावेश होता, तसेच या कार्यक्रमात वरूडे, वाघाळे,गणेगाव,सरडवाडी, खंडाळे, करडे, गोलेगाव व भाग शाळा उपस्थित होत्या.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने करणी, जादूटोन केलाय असे सांगणारे भोंदूबाबा कसे आपल्याला फसवतात हे प्रयोगांच्या माध्यमातून तसेच अंधश्रद्धेमुळे किती लोकांचे जीव गेलेत हे अनेक उदाहरणांचा साहाय्याने पटवून देण्यात आले.या प्रसंगी मुलांनी विज्ञान दिनाचे महत्त्व भाषणांतुन व्यक्त केले.

शाळेत मुलांनी वेगवेगळी मॉडेल ही प्रदर्शनात मांडली होती त्यामध्ये प्रथम च्या विज्ञान कॅम्प मध्ये मुलांकडून प्रत्यक्ष तयार करून घेतलेली अनंतपत, पेरिस्कोप, मानवी शरीर,हवेचा दाब इत्यादी मॉडेल त्यांनी प्रदर्शनात मांडली होती आणि त्याची माहिती ही अभ्यासपूर्ण सांगितली.

या कार्यक्रमासाठी गोलेलेगावच्या सरपंच सरस्वती कटके कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिन्द्र गायकवाड,उपाध्यक्षा सोनाली भोगावडे, माजी सरपंच लक्ष्मण पडवळ, योगेश इंगळे, अंनिस चे नवनाथ लोंढे, माजी सैनिक सुरेश पडवळ, केंद्र प्रमुख सुनिल घुमरे, रणजित वाघमारे,मुख्याध्यापक संदिप आढाव, सरोदे , पवार, रणदिवे आदी शिक्षक उपस्थित होते. तर प्रथम एज्युकेशन फौंडेशनच्या लता खरात, अनिल कांबळे, अमोल रणदिवे, अतुल पाचुंदकर, अमोल म्हस्के, उषा लवांडे, विज्ञान मित्र विशाल थोरात व पुष्पां पावरा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जगताप यांनी केले तर आभार अनिल कंबळे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या