शिरुरला घड्याळात टिकटिक नक्की कुणाची ?

Image may contain: 1 person, beard and closeupशिरुर,ता.१ मार्च २०१९ (प्रतिनीधी) : अभिनेते अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली असुन शिरुर लोकसभेतुन निवडणुक लढविण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शिरुरला घड्याळात टिकटिक कुणाची याचीच चर्चा जोरात रंगु लागली आहे.

काही दिवसांआधी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमधील गोविंद बाग इथल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.यावेळी अभिनेते अमोल कोल्हे हे देखील त्यांच्यासोबत होते.या दोघांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल होणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कोल्हे यांच्यासह दोन माजी आमदारांचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित मुंबईत प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. अमोल कोल्हे हे सध्या शिवसेनेत आहे. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या