रामलिंग महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

Image may contain: 10 people, people standingशिरुर,ता.४ मार्च २०१९(प्रतिनीधी) : ढोल ताशा अन सुमधुर बॅंड, ढाळघोषांचा गजर अन हर हर महादेव चा नामघोष करत  शिरूर शहरातुन जुने शिरूर (रामलिंग) चे जागृत देवस्थान श्री रामलिंग महाराज पालखीचे मोठ्या भक्तीभावाने प्रस्थान झाले.

शिरूर तालुक्याचे जागरूक देवस्थान रामलिंग महाराज यात्रा महाशिवरात्री च्या दिवशी जुने शिरूर येथील मंदिरात  यात्रा भरवली जाते. त्या अगोदरच्या दिवशी या यात्रेची पालखीचा मान शिरूर शहराला असतो तर यात्रेचा मान शिरूर परिसरातील पंचक्रोशिला असतो. शिरूर शहरांतील शिवसेवा मंदिरात उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या हस्ते महाआरती करून पालखी सोहळ्यास दुपारी सुरुवात झाली. यावेळी शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे,माजी आमदार अशोक पवार, आदींनी हजेरी लावली.प्रथेप्रमाणे पालखी सोहळ्याचे स्वागत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी पालखीस पुष्पहार घालून स्वागत केले.यावेळी रामलिंग देवस्थान यांच्या वतीने मानाचा फेटा नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांना बांधण्यात आला. यावेळी देवस्थान अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल,विश्वस्त यांना नगरपरिषद यांचे वतीने मानाचा फेटा बांधण्यात आला व मुख्य पालखी सोहळ्यास शहरातुन सुरवात झाली.

या पालखी सोहळ्यासाठी रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल, ट्रस्टी तसेच शिवसेवा मंडळ ट्रस्टचे ट्रस्टी, तहसिलदार गुरु बिराजदार,शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, माजी नगराध्यक्ष रविंद्र  ढोबळे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती सचिन धाडिवाल,पाणी पुरवठा समिती सभापती विठ्ठल पवार,बांधकाम समिती सभापती अभिजित पाचर्णे,नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, संजय देशमुख,महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता कुरंदळे,उपसभापती अंजली थोरात,शिक्षण समिती सभापती मनिषा कालेवार व सर्व नगरसेवक, नगरसेविका,रामलिंगचे माजी सरपंच अरुण घावटे,माजी उपसरपंच संजय शिंदे,खरेदी विक्रीचे संचालक नामदेव जाधव,ड्रग स्टोर चे दिपक तातेड,माजी नगरसेवक प्रविण दसगुडे,निलेश लटांबळे,दिलीप करंजुले,पंचक्रोशि चे तरुण कार्यकर्ते यांसह आबाल वृद्ध यांनी पालखी व रामलिंगचे दर्शन घेतले.

या वेळी शिरुर शहरातील भाविक मोठया प्रमाणात उपस्थित होते.आजच्या या पालखी सोहळ्यात संपूर्ण शिरूर शहर भगव्या पताका, भगवे झेंडे, प्रत्येक ठिकाणी स्वागतासाठी कमानी उभारल्या होत्या.शहरातील पुणे-नगर रस्त्यावर विद्युत रोशनाई करण्यात आली होती. पालखी मिरवणुक मधे प्रत्येक नागरिकांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. यामुळे भगवेमय वातावरण तयार झाले होते.चौका-चौकात प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिरुर,पारनेर,श्रीगोंदा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शिरूरचे निनाद ढोल पथक,युवा ढोल पथक,डोने ता.मावळ येथील झांज पथक,अमर ब्रासबॅड, हबीब ब्रास बॅड तर आळंदी येथील वारकरी भजनी मंडळ तर पालखी समोर असलेले भालदार चोपदार,तुलसी घेतेलेले महिला व सहभागी अश्व हे आजच्या पालखी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले तर शहरातील कापड बाजार,अखिल रामआळी,दधिची चौक, मारुती आळी, आझाद सोशल क्लब, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभारआळी, अजिंक्य तारा मित्र मंडळ, मुम्बई बाजार, डबेनाल मित्र मंडळ यांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक देखावे व भाविकांचे करिता नाश्ता,सरबत, चहा यांची सोय केली होती तर तर शहरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले. आज पहाटे शिरूर शहरातून रामलिंग येथे प्रस्थान होईल रामलिंग मंदिरात पालखी पोहचल्या नंतर महाभिषेक होऊन महाशिवरात्र निमित्त रामलिंग यात्रेस सुरवात होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या