मी चौकार मारायला उभा आहे... पणः आढळराव पाटील

शिरूर, ता. 4 मार्च 2019 : "मी चौकार मारायला उभा आहे, मात्र समोर विरोधकांकडे अजूनही बॉलरच नाही,'' अशी प्रतिक्रिया शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आयोजित स्ट्रीट लाइट प्रकल्प उद्‌घाटन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

आळेफाटा येथे एका कार्यक्रमात बोलताना आढळराव पाटील म्हणाले, "विरोधकांना गेली पंधरा वर्षे उमेदवारच मिळेना. माझ्या विकासकामांवर व जनतेवर माझा विश्वास असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीतही विजयी होणार आहे.

दरम्यान, शिरूर लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत आली आहे. आढळराव चौकार मारायला तयार आहेत पण विरोधकांकडे बॉलर नाही, असे आढळराव म्हणतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवले आहे. मंगलदास बांदलही कुस्ती चितपट करण्यासाठी तयार आहेत. यामुळे पुढे काय चित्र रंगणार या विषयी चर्चेंना उधान आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या