शिरूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रसेचे मेळावे

No photo description available.
शिरूर, ता. 5 मार्च 2019: अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाने शिरूर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असून, पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आजपासून तीन दिवस मतदार संघात मेळावे घेणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संघातील प्रत्येक तालुक्‍यात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अमोल कोल्हे हे मेळाव्यातील प्रमुख आकर्षण असणार आहेत.

आज (ता. 5) भोसरी व नारायणगाव येथे, तर बुधवारी खेड, हडपसर व वाघोली येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (ता. 7) सकाळी मंचरला; तर त्यानंतर शिरूरला कार्यकर्ता मेळावा होणार आहे. लोकसभेसाठी शड्डू ठोकलेले विलास लांडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार अशोक पवार व दिलीप मोहिते, युवा नेते अतुल बेनके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंबेगाव मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम हे आपापल्या कार्यक्षेत्रातील मेळाव्यांचे नियोजन करीत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीने अद्याप शिरूर लोकसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी कोणता उमेदवार रिंगणात उभा करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार चौकार मारण्याच्या तयारीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या