डॉ. एकनाथ खेडकर यांची डीएसआयच्या उपाध्यक्षपदी निवड

Image may contain: 1 person, smiling, beard and closeup
रांजणगाव गणपती, ता. 7 मार्च 2019 : रांजणगावचे सुपुत्र व अजिंक्‍य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांची शैक्षणिक, व्यावसायिक व संशोधक क्षेत्रातील तज्ज्ञांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटचे (डीएसआय) संचालक व उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. डॉ. खेडकर यांनी चीनचे ट्रीटीश लाओसिरिहौंग्तोंग यांचा पराभव केला.

डीएसआय ही संस्था अमेरिकेतील पाच प्रादेशिक विभागात तसेच मेक्‍सिको, एशिया पेसिफिक व भारतीय उपखंडात कार्यरत आहे. देशभरातील आयआयएम, आयआयटी, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक या संस्थेचे सदस्य आहेत. संस्थेचे मुख्यालय अटलांटा (अमेरिका) येथे आहे. या संस्थेच्या संचालक व उपाध्यक्ष पदासाठी जागतिक पातळीवर निवडणूक लढवली जाते. डॉ. खेडकर यांचे प्रतिस्पर्धी म्हणून चीनचे ट्रीटीश लाओसिरीहौंग्तोंग उभे राहिले होते. भारतातून निवडणूक लढवून निवडून येणारे डॉ. खेडकर हे तिसरे व्यक्ती ठरले असून, शैक्षाणिक क्षेत्रात भारतासाठी मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी भिमराया मैत्री आणि डॉ. रविकुमार जैन हे डीएसआयच्या उपाध्यपदी निवडून आले होते.

डॉ. खेडकर म्हणाले, 'जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या निवडीमुळे प्राप्त झाली आहे. भारताचे प्रतिनिधित्त्व करताना आपली विद्यापीठे जागतीक पातळीवरीत पहिल्या पाचशे विद्यापीठांच्या क्रमवारीत का येत नाहीत? भारतातील विद्यापीठांमध्ये कोणत्या प्रकारचे संशोधन वाढविणे गरजेचे आहे? देशाचा सशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी काय करण्याची आवश्‍यकता आहे? याबाबतची माहिती जागतिक स्थरावर काम करताना मिळू शकेल. पुढील काळात त्यादृष्टीने काम करून देशाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करता येतील.'

दरम्यान, डॉ. खेडकर यांची निवड झाल्याची माहिती शिरूर तालुक्यात समजल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिरूर तालुक्यासाठी मोठा अभिमान असल्याचे अनेकांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या